WhatsApp Pixabay

फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स सातत्याने नवनवीन मार्ग शोधत असतात. आता एक नवा स्कॅम व्हॉट्सअ‍ॅप ( WhatsApp) द्वारा सुरू करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅप वर काही अनोळखी नंबर व्हॉट्सअ‍ॅपद्वारा युजर्सला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉल्स आणि मेसेज द्वारा ते फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने साऊथ ईस्ट आशिया भागातील नंबर आहेत. हे स्कॅमर्स नंबर्स +84 व्हिएतनाम, +62 इंडोनेशिया आणि +223 माली येथील नंबर्स आहेत.

स्कॅमर्स इंटरनॅशनल नंबर्स वरून फोन करत असले तरीही ते याच देशातून कॉल करत आहेत असे नाही. ते सीम्स आणि फोन नंबर वापरत आहेत जे जगाच्या कोणत्याही भागातून वापरता येऊ शकतात. हे स्कॅम इतके बेसावधपणे केले जात आहेत की लोकं सहज त्यांच्या जाळ्यात अडकल्याने पैसे किंवा खाजगी माहिती गमावू शकत आहेत.

एका युजर ने त्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये तो सांगतो की ' मला इंटरनॅशनल नंबर वरून मेसेज आला. ज्यात व्हिएतनाम वरून फ्रीलान्स माध्यातून वरकमाईचा पर्याय सूचवला होता. यामध्ये मला केवळ युट्युब व्हिडिओ वर लाईक करायचे होते. हा स्कॅम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी काही अ‍ॅप किंवा टेलिग्राम चॅनल इंस्टॉल करण्यास सांगितले जाते. यामध्ये पीडीत व्यक्तीला स्टॉक किंवा क्रिप्टो करंसी मध्ये पैसे गुंतवण्यास सांगतात. New Malware On Telegram: हॅकर्स टेलीग्रामवर विकत आहेत नवीन मालवेअर, जे चोरतात पीडिताच्या मशीनमधून संवेदनशील माहिती .

सध्या अशा स्कॅम पासून दूर रहायचे असेल तर अनोळखी इंटरनॅशनल नंबर्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे मोठं नुकसान होण्याचा धोका आहे. कोणत्याही संपर्क सुरू करण्यापूर्वी समोरच्या नंबरची खातरजमा करून घ्या. अनोळखी नंबर सोबत संपर्क टाळा, फोनवर आर्थिक व्यवहारही टाळा.