WhatsApp च्या 'या' नव्या फीचरमुळे  Group Video Calling होणार अधिक सुकर
Representational image of messaging application WhatsApp | (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Group Video Calling Feature:  व्हॉट्सअ‍ॅपच्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जनवर (WhatsApp  Android version) आता एक नवं अपडेट आलं आहे. यामध्ये व्हिडिओ कॉल करण्यासाठी एक खास बटण देण्यात आलं आहे. मागील महिन्यात आयफोन युजर्ससाठी देण्यात आलेलं हे फीचर आता काही महिन्यांसाठी व्हॉट्स अ‍ॅप बीटा व्हर्जनसाठी खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे मित्रांसोबत व्हिडिओ कॉल करणं सुकर होणार आहे. जुने मेसेज अचानक गायब होण्याच्या तक्रारींवर WhatsApp कडून देण्यात आलं 'हे' उत्तर!

ऑगस्ट 2018 पासून व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप कॉलिंगचा पर्याय दिला आहे. मात्र ती प्रक्रिया वेळखाऊ असल्याने युजर्सना अनेक टॅब ओपन करावे लागत होते.आधी तुम्हांला व्हिडिओ कॉल सुरू करावा लागत होता त्यानंतर कॉल कनेक्ट झाल्यावर तुम्हांला इतर मित्र-मैत्रिणींना त्यामध्ये अ‍ॅड करण्याची सोय देण्यात आली होतील ही वेळखाऊ प्रक्रिया आणि किचकट प्रक्रिया होती. मात्र आता एका नव्या बटणामुळे हा सारा प्रकार सुकर होणार आहे.

व्हिडिओ कॉल कसा कराल ?

  • नव्या बटणामुळे ग्रुपमधील तुमच्या सोयीच्या कॉन्टॅक्ट्ससोबत बोलणं सोप्प होणार आहे.
  • याकरिता add participant button वर क्लिक करावे लागेल. हे बटण hamburger button (उजव्या बाजूला 3 डॉट्स) जवळ असेल.
  • यानंतर तुमच्या मित्रांची एक लिस्ट दिसेल. त्यांच्यासोबत कॉलवर बोलू शकाल.
  • जास्तीत जास्त तुम्ही 4 लोकांसोबत बोलू शकाल.

व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर सुरूवातीला WhatsApp beta वर तपासलं जाईल.तुम्हांलादेखील हे फीचर पहायचं असेल तर टेस्टर होणं गरजेचं आहे. या लिंकवर क्लिक करून टेस्टर व्हा. व्हॉट्स अ‍ॅप बीटा व्हर्जन हे बग्स आणि क्रॅश या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याचा वापर करण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा.