New IT Rules Impact: सोशल मीडिया कंपनी फेसबुक कडून मंगळवारी असे सांगण्यात आले आहे की, 2 जुलै रोजी नव्या आयटी नियमाअंतर्गत येणारा पहिला अंतरिम रिपोर्ट जाहीर करणारआहे. या रिपोर्टमध्ये 15 मे ते 15 जून दरम्यान फेसबुकवरील किती कंटेट हटवला आहे ते सांगितले जाणार आहे. याचा अंतिम रिपोर्ट 15 जुलै रोजी जाहीर केला जाईल. त्यात असे सांगितले जाईल की, फेसबुक युजर्सकडून किती तक्रारी आल्या असून किती तक्रारींच्या विरोधात कारवाई केली आहे.
देशात नवे आयटी नियम 25 मे पासून लागू करण्यात आले होते. त्यानुसार सोशल मीडिया कंपन्या प्रत्येक महिन्यासाठी एक तक्रारींचा रिपोर्ट काढतात. यामध्ये तक्रार आणि त्यांच्या निवारणाबद्दल माहिती दिलेली असते. तसेच फेसबुकवरुन हटवण्यात आलेल्या पोस्टची लिंक माहितीच्या आधारावर दाखल होणार आहे.(Fake Account ला आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! तक्रारीनंतर 24 तासांत फेक अकाऊंट होणार बंद)
Facebook च्या प्रवक्तांच्या मते, या प्रकरणी अंतिम रिपोर्ट 15 जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या डेटाचा सुद्धा समावेश असणार आहे, कंपनीने स्पष्ट केले आहे की, फेसबुक येत्या 2 जुलै रोजी अंतरिम रिपोर्ट जाहीर करणार आहे. ज्यामध्ये तक्रारी आणि त्यासंबंधित निवारणाबद्दल माहिती दिली जाणार आहे. कारण कंपनी अद्याप या तक्रारींवर काम करत आहे.
नवे आयटी नियम हे डिजिटल प्लॅटफॉर्मचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यावर आळा घालण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. त्याचसोबत सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक करावी लागणार आहे. तसेच तक्रारींच्या लिंक्स तपासानंतर हटवाव्या लागणार आहेत. कंटेट काढून टाकण्याचे काम 36 तासांच्या आतमध्ये करणे अनिवार्य आहे. त्याचसोबत अश्लील कंटेट 24 तासाच्या आतमध्ये काढून टाकावा.