Netflix करणार गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री, कंपनीने सुरु केली लॉन्चिंगची तयार
Photo Credit : IANS

नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच गेमिंग इंडस्ट्रीमध्ये उतरणार आहे. यासाठी नेटफ्लिक्सकडून एका एक्झिक्युटिव्हची हायरिंग केली जात आहे. जो ग्लोबल स्तरावर नेटफ्लिक्सच्या गेमिंग डिव्हिजनची जबाबदारी सांभाळू शकेल. खरंतर नेटफ्लिक्सने कंटेटमध्ये काही बदल करण्याचे जाहीर केले आहे. अशातच कंपनी नव्या कॅटगरी सुद्धा लॉन्च करणार आहे. यामध्येच एक व्हिडिओ गेमिंग कॅटेगरी असू शकते. नेटफ्लिक्सला जुन्या ओटीटी कंटेंटमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागला होता.(नवा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी 'या' स्पेसिफिकेशनवर जरुर लक्ष द्या अन्यथा फसवणूकीला बळी पडाल)

नेटफ्लिक्सकडून गेमिंग इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोविड19 च्या परिस्थितीमुळे बहुतांश गेमिंग इंडस्ट्रीला याचा मोठा फायदा होत आहे. कंपनीकडून अनुभवी गेमिंग इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्यात आला आहे. त्याचसोबत गेल्या काही दिवसात इंटरॅक्टिव्ह प्रोग्रामिंगसह गेमिंग बेस्ड शो जसे Stranger Things आणि La Casa De Paple (Money Hiest) तयार करण्यात आले. जे नेटफ्लिक्स गेमिंगच्या दुनियेत पाऊल ठेवणार असल्याचा इशारा देतात.

गेल्या शुक्रवारी असे समोर आले होते की, नेटफ्लिक्सने एका ऑप्शनच्या आधारावर Apple Arcade चे ऑनलाईन सब्सक्रिप्शन ऑफर केले आहे. नेटफ्लिक्सची गेमिंग बद्दलची रणनिती अद्याप प्रायोगिक तत्वावर आहे. अशाच याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही आहे. मात्र एका रिपोट्सनुसार गेम कंटेंट मध्ये जाहिरातींचा समावेश केला जाणार नाही आहे.(भारतीय भाषा शिकून घेण्याच्या ॲपसाठी MyGov कडून Innovation Challenge; 27 मे पर्यंत करू शकता अर्ज)

नेटफ्लिक्सच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आपल्या व्हिडिओ गेमिंग स्ट्रिमिंगच्या सब्सक्रिप्शनसह N-Plus सब्सक्रिप्शन सुद्धा ऑफर करणार आहे. जो युजर्सला Podcasts, कस्टम टीव्ही शो प्लेलिस्टची माहिती देणार आहे. N-Plus सब्सक्रायब्रर्सला प्री-प्लॅन शो च्या प्रोडक्शनमध्ये ही मदत करणार आहे.