व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्विस Netflix यांनी गुरुवारी त्यांच्या हिंदी युजर्ससाठी इंटरफेस लॉन्च केले आहे. युजर्सला हिंदी इंटरफेस मोबाईल, टीव्ही आणि वेब डिवाइसवर उपलब्ध होणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की, युजर्सला इंटरनॅशलन शो, चित्रपट आणि वेब सीरिज हिंदी मध्ये सर्च करता येणार आहेत. त्याचसोबत उत्तम इंग्रजी असणाऱ्यांना सुद्धा हिंदी भाषेतील नेटफ्लिक्सचा वापर करणे सोपे होणार आहे. नेटफ्लिक्सच्या नव्या युजर्सला इंटरफेसमध्ये साइन-इन ते सर्च, कलेक्शन आणि पेमेंट पर्यंत मोबाईल, टीव्ही आणि वेब सहित सर्व डिवाइसेसवर हिंदी उपलब्ध होणार आहे.
नेटफ्लिक्स युजर्सला हिंदी इंटरफेसचा वापर करण्यासाठी आपल्या डेस्कटॉप, टीव्ही किंवा मोबाईल ब्राउजरमध्ये जाऊन Manage Profile ऑप्शन येथे क्लिक करुन कोणती भाषा हवी आहे तो ऑप्शन निवडावा लागणार आहे. एकाच नेटफ्लिक्सचा वापर करुन कमीतकमी पाच जण पाहू शकता. तसेच प्रत्येकाला सीरिज पाहण्यासाठी विविध भाषा सुद्धा निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. भारताच्या बाहेर राहणाऱ्या नेटफ्लिक्सच्या सदस्यांना सुद्धा इंटरफेस हिंदी मध्ये बदलण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
नेटफ्लिक्स इंडियाचे वाईस प्रेसिडंट मोनिका शेरगिल यांनी असे म्हटले आहे की, नेटफ्लिक्सचा उत्तम अनुभव आमच्यासाठी खुप महत्वाचा आहे. ते तेवढेच गरजेचे आहे जेवढा उत्तम कन्टेंट असणे गरजेचे आहे. नव्या युजर्सला इंटरफेस नेटफ्लिक्स आणि अधिक एक्सेसिबल ठेवणे आणि हिंदी युजर्ससाठी हे फार फायदेशीर ठरणार आहे. (Facebook कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभुमीर येत्या जुलै 2021 पर्यंत Work From Home करण्याची मुभा)
दरम्यान, नेटफ्लिक्सकडून भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये गुंतवणूक केली जात आहे. कंपनीने नुकतेच 17 नवे चित्रपट आणि वेब सीरिज लॉन्च करणार असल्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये लूडो, अ सुटेबल बॉय अॅन्ज मिसमॅच्ड आणि गुंजन सक्सेना यांचा समावेश आहे. हे चित्रपट 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स स्मार्ट डाऊनलोड्सस पॅरेंटल कंट्रोल्स आणि टॉप 10 Row सारखे ऑप्शन उत्तम अनुभव देतात.