व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यास घ्यावी लागेल परवानगी; केंद्र सरकारने दिले नवे फीचर अॅड करण्याचे आदेश
व्हॉट्सअ‍ॅप (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ग्रुपमुळे होणाऱ्या दुर्घटना, माजणारे गदारोळ रोखण्यासाठी आता केंद्र सरकारला याबाबतीत लक्ष घालावे लागले आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सध्या कोणीही कोणालाही सामील करून घेऊ शकतो. त्यामुळे अनोखळी व्यक्तींकडे आपला नंबर जातो यामुळे अनेक महिलांना वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले होते. अशा घटना रोखण्यासाठी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालया (Ministry of Electronics and IT) कडून, ‘व्हॉट्सअपमध्ये असे एखादे फीचर अॅड करण्यात यावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय त्या ग्रुपमध्ये सामील करून घेता येणार नाही’ सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी संबंधित यूजरची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

व्हॉटसअ‍ॅपने म्हटले होते की, जर सदस्य एखाद्या ग्रुपमधून दोनदा बाहेर पडला, तर अ‍ॅडमिनही त्याला पुन्हा सामील करू शकत नाही. मात्र नवीन ग्रुप सुरु करून लोकांना पुन्हा सामील करून घेण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सहमती असेल तरच त्याला ग्रुपमध्ये घ्यावे, नकळत वा परस्पर कोणालाही ग्रुपमध्ये घेण्याचा अधिकार अ‍ॅडमिनला नसावा अशे मागणी करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला अशा प्रकारचे नवीन फीचर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा : तुम्हीही विश्वास ठेवता स्मार्टफोनसंदर्भात असणाऱ्या या काही चुकीच्या अफवांवर?)

दरम्यान आता व्हॉट्सअ‍ॅपवर राहायचे असेल तर काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर कुठल्याही प्रकारची चाइल्ड पॉर्नोग्राफी शेअर करू शकत नाही. तसेच एखाद्या वापरकर्त्याबद्दल कंपनीकडे तक्रार केल्यास कंपनी त्याचे अकाउंट बंद करू शकते.

व्हॉट्सअ‍ॅपवर या गोष्टी केल्यास जावे लागेल तुरुंगात

  1. आपल्या ग्रुपवर कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो किंवा मेसेज शेअर झाल्यास.
  2. कुठल्याही धार्मिक व्हिडिओ, फोटो, टेक्स्ट, ऐतिहासिक आकडे शेअर केल्यास.
  3. जात किंवा धार्मिक भावना भडकतील असे मजकूर शेअर केल्यास