Flipkart Big Billion Day 2020: मोटोरोला कंपनीच्या 'या' स्मार्टफोनवर तब्बल 40 हजारांची सूट
Motorola Razr (Photo Credit: Twitter)

फ्लिपकार्टवर येत्या 16 ऑक्टोबरपासून 'द बिग बिलियन डेज सेल' (Flipkart Big Billion Days Sale) सुरु होणार आहे. या सेलदरम्यान लाखो विक्रेता, कारीगर आणि ब्रॅन्ड्स एकसोबत फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर 2.5 कोटीपेक्षा अधिक उत्पादन घेऊन येणार आहेत. यातच मोटोरोला (Motorola) कंपनीने आपल्या स्मार्टफोनसाठी डिल्स आणि डिस्काउंट्सची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज सेल’मध्ये मोटोरोला रेझर (2019) (Motorola Razr) वरही मोठी सूट देण्यात आली असून याची किंमत 84 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 40 हजारांची सूट मिळणार आहे.

हा मोटोरोलाचा फ्लिप फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये आहे. सेलमध्ये हा फोन 84 हजार 999 रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या स्मार्टफोनला 2 डिस्प्ले देण्यात आले आहेत. तसेच हा स्मार्टफोन उघडल्यानंतर 6.2 इंचाचा डिस्प्ले तर बाहेरचा 2.7 इंचाचा छोटा डिस्प्ले मिळतो. हा स्मार्टफोन 2 रंगात उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त मोटो जी 9 (Moto G9), मोटोरोला वन फ्यूसन प्लस (Motorola One Fusion+) आणि मोटो इ7 प्लस (Moto E7 Plus) यासारख्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन सेलमध्ये लॅपटॉवर मिळेल 35 हजार रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या इतर ब्रँडवरील खास ऑफरविषयी

हा इव्हेन्ट सुरु होण्याअगोदरच प्लिपकार्ट ग्राहकांच्या आवडत्या उत्पदनासाठी प्री बुकींग आणि आपल्या शॉपिंग कार्ट तयार करण्याची संधी घेऊन आला आहे. प्लिपकार्टवर आज मध्यरात्रीपासून प्री-बूक स्टोर सुरु झाले आहे. तसेच ग्राहकांना 14 ऑक्टोबरपर्यंत प्री-बुकींग करता येणार आहे. ग्राहक केवळ एक रुपयांत ऑर्डर करू शकतात.