Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन सेलमध्ये लॅपटॉवर मिळेल 35 हजार रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या इतर ब्रँडवरील खास ऑफरविषयी
Laptop (Photo Credit - Pxhere)

Amazon Great Indian Festival Sale: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. ही विक्री 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 16 ऑक्टोबरपासून प्राइम मेंबर्सला याचा लाभ घेता येणार आहे. सेलची तारीख जवळ आली असून अॅमेझॉन आपल्या विविध उत्पादनांवरील खास ऑफर्स ग्राहकांना सांगत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. सेलमध्ये ग्राहक कमी किंमतीत स्मार्टफोन, अ‍ॅक्सेसरीज, होम अप्लायन्सेस आणि लॅपटॉप्ससह विविध उत्पादने खरेदी करू शकतात.

अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये लॅपटॉपवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनने सांगितले की, ग्राहक ऐसर, आसुस, ऐपल, एचपी, लेनोवो आणि शाओमी यासारख्या कंपन्यांचे लॅपटॉप सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, या सेलमध्ये कोणत्या कंपनीच्या लॅपटॉवर किती सूट मिळेल. (हेही वाचा - Amazon Great Indian Festival Sale: 'अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल'मध्ये OnePlus 8 5G स्मार्टफोनवर मिळणार 5 हजार रुपयांची सुट; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत)

'या' लॅपटॉवर मिळणार मोठी सूट -

Acer, Asus आणि Lenovo च्या लॅपटॉपवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

डेलच्या लॅपटॉपवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

एचपी लॅपटॉपवर 25 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

Avita लॅपटॉपवर 19 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

Apple च्या लॅपटॉपवर 15 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

शाओमीच्या लॅपटॉपवर 9 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.

अ‍ॅमेझॉन सेलच्या विक्रीदरम्यान लॅपटॉपची किंमत 19,990 रुपयांपेक्षा कमी दराने सुरू होणार आहे. याच तीन महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय पर्यायदेखील असेल. या व्यतिरिक्त एचडीएफसी बँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डधारकांना सेलमध्ये 10% ची स्वतंत्र सवलत दिली जाईल.