Motorola One Fusion+ स्मार्टफोनसाठी Flipkart वर आज दुपारी 12 वाजता सेल, ग्राहकांना मिळणार धमाकेदार ऑफर्स
Motorola One Fusion+ (Photo Credits-Twitter)

Motorola One Fusion+ स्मार्टफोनसाठी आज पुन्हा सेल असणार आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनसाठी युजर्सकडून पसंदी मिळाली आहे. यापुर्वी सुद्धा मोटोरोला वन फ्युजन प्लस स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला होता त्यावेळी तो Out Of Stock झाला होता. त्यानंतर आता ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) आज दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनसाठी सेल सुरु होणार आहे.(Redmi नोट स्मार्टफोन खरेदी केल्यास युजर्सला Earphones मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर)

मोटोरोला वन फ्युजन प्लस हा स्मार्टफोन भारतात 16,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. परंतु आता याच्या किंमतीत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास तो आता 17,499 रुपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन मुनलाईट व्हाइट आणि ट्वालाईट ब्लू रंगात लॉन्च करण्यात आला आहे. मोटोरोला कंपनीच्या या स्मार्टफोनसाठी प्रीमियम फिचर्स ही देण्यात आले आहेत. हँडसेट मध्ये पॉप-अप कॅमेरासह इन्फिनिटी डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनची टक्कर रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रिअलमी 6 प्रो आणि पोको एक्स 2 सोबत होणार आहे.

मोटो कंपनीचा हा स्मार्टफोन जर तुम्ही फ्लिपकार्ट येथून अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास त्यावर 5 टक्के सूट मिळणार आहे. तसेच या बँकेच्या बज क्रेडिट कार्डवर सुद्धा 5 टक्के डिस्काउंट दिला जाणारआहे. नो-कॉस्ट EMI ऑफर सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. पार्टनर ऑफर अंतर्गत युट्युब प्रीमियमचे 6 महिन्यांसाठी फ्री ट्रायल उपलब्ध करुन दिले जाणार आहे.(48 मेगापिक्सल असलेला Motorola One Vision Plus लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत)

स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा टोटल व्हिजन डिस्प्ले दिला असून जो फुल एचडी प्लस रेज्यॉलूशनचा आहे. स्क्रिनबाबत बोलयचे झाल्यास त्याचा रेशो 19.5:9 आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 16 मेगाापिक्सल पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज ही दिला आहे. फोनमधील स्टोरेज मायक्रोएसडीच्या माध्यमातून वाढवता येणार आहे. तसेच स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसरवर काम करणार आहे. 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असून 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅश आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. मोटोरोलाच्या या लेटेस्ट वन प्लस फ्युजनसाठी प्लास्टिक फ्रेमसह प्लास्टिक रियर पॅनल दिला आहे. स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 वर चालणार असून यामध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. फोनसाठी 18 वॅट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली आहे.