Moto G7 स्मार्टफोन खास फीचर्ससह आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत
Moto Smartphone (Photo Credits- Twitter)

Moto कंपनी आज भारतात Moro G7 लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचा टीझर गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर झळकवण्यात आला होता. तसेच कंपनीने Moto G7 Power भारतात यापूर्वी लॉन्च केला होता. फेब्रुवारी महिन्यात ब्राझील येथे Moto G7 Play, Moto G7 Pluse आणि Moto G7 Power लॉन्च करण्यात आले होते.

Moto G7 या स्मार्टफोनमध्ये 6.24 इंच Full HD डिस्प्ले देण्यात आला असून क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 632 चे प्रोसेसर असणार आहे. तसेच 4 GB RAM असून इंटर्नल मेमरी 64 GB दिली आहे. मोटो कंपनीचा हा स्मार्टफोन लेटेस्ट अँन्ड्रॉईड व्हर्जनवर चालतो. फोटोसाठी स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असे डुअल रियर कॅमेरा असून सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. दोन सिमकार्ड सुद्धा या स्मार्टफोनसाठी युजर्सला वापरता येणार आहेत.(हेही वाचा-Amazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर)

कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर, 299 डॉलर म्हणजेच 20,700 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. मात्र भारतात 20,000 पेक्षा कमी किंमतीत लॉन्च होणार आहे. तसेच कंपनी मोटो जी 7 स्मार्टफोन ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेल स्टोरमध्ये विक्रीसाठी उपलतब्ध करुन देणार आहे.