Amazon Fab Phones Fest Sale,Flipkart Mobiles Bonanza Sale: 25-28 मार्च दरम्यान स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती; नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर
Amazon Flipkart Mobile Sale (Photo Credits: Amazon, Flipkart Official Sites)

अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट्स (Flipkart) या आघाडीच्या ई कॉमर्स वेबसाईट्सवर 25-28 मार्च दरम्यान खास मोबाईल डील्स मिळणार आहेत. यामध्ये Realme U1, Huawei Y9 (2019), Vivo Y83 Pro या बहुप्रतिक्षित मोबाईल फोन्सवर डील मिळणार आहेत. त्यामुळे आजपासून पुढील तीन दिवस युजर्सना मोबाईल फोन्सवर अनेक सवलती मिळणार आहेत. यामध्ये नो कॉस्ट ईएमआयसह बॅंकिंग डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहेत.

अ‍ॅमेझॉनवर Fab Phone Fest

Amazon Fab Phones Fest Sale ( Photo Credits: Amazon )

25-28 मार्च दरम्यान अ‍ॅमेझॉनवर Fab Phone Fest सुरू आहे. यामध्ये Realme U1, Huawei Y9 (2019), Vivo Y83 Pro वर खास सवलत मिळणार आहे.

  • Realme U1: हा स्मार्टफोन ₹ 9,999 मध्ये उपलब्ध होईल. ग्राहकांना 2 हजार रूपयांचं डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबत नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर आहे.
  • Huawei Y9 (2019): भारतामध्ये यंदा वर्षाच्या सुरूवातीला हा स्मार्टफोन लॉन्च झाला. सेलमध्ये हा फोन एक हजाराच्या सवलतीमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत Rs. 14,990 असेल. सोबतच नो कॉस्ट इएमआय, SBI Credit card वर कॅशबॅक ऑफर, एएमआय ट्रॅन्झॅक्शन असेल.एक्सचेंजमध्ये याची किंमत सुमारे 13,050 रूपये असेल.Vivo Y83 Pro: हा फोन ₹ 11,990 ला उपलब्ध असेल. हजार रूपयांचा Amazon Pay balance मध्ये कॅशबॅक, SBI Credit card वर कॅशबॅक ऑफर, एएमआय ट्रॅन्झॅक्शन असेल. नो कॉस्ट इएमआयचादेखील पर्याय खुला असेल.

    अमेझॉनवर OnePlus 6T, Xiaomi Mi A2 ₹ 11,649, Oppo F11 Pro ₹ 22,670, आणि Vivo V15 Pro ₹ 26,959 अशा खास दरात मोबाईल फोन्स उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टवर Mobiles Bonanza

Flipkart Mobiles Bonanza Sale (Photo Credits: Flipkart)

अ‍ॅमेझॉनच्या सोबतीनेच फ्लिपकार्टवरही खास सवलतीच्या दरात मोबाईल फोन्स उपलब्ध आहेत. यामध्ये नो कॉस्ट इएमआय, Axis Bank Credit Card धारकांना खास 5% तात्काळ डिस्काऊंट उपलब्ध होणार आहे. तर एक्सचेंजसाठी ग्राहकांना Rs 500 ची खास सवलत मिळणार आहे.

  • Realme 2 Pro: हा स्मार्टफोन 11,990 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये 8GB RAM,128GB storage,Android Oreo ऑपरेंटिंग सिस्टीम असणार्‍या फोनमध्ये 3,500mAh battery आहे.
  • Apple iPhone XR: हा स्मार्टफोन 67,999 पासून उपलब्ध होणार आहे. या फोनवर सुमारे 8-9 हजारांची सूट देण्यात आली आहे. 12-megapixel camera आणि 7-megapixel selfie shooter उपलब्ध आहे. काळा, लाल, निळा, पिवळा, कोरल रंगामध्ये फोन उपलब्ध आहे.Samsung Galaxy Note 8, Galaxy S8: अ‍ॅप्पलप्रमाणेच सॅमसंगच्या मोबाईल फोनवरही सूट उपलब्ध आहे. यामध्ये Galaxy Note 8,36,990 रूपयांमध्ये तर Galaxy S8 हा

    स्मार्टफोन 29,990 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

यासोबतच Xiaomi Redmi Go हा स्मार्टफोन flash sale च्या माध्यमातून दुपारी 12:00 वाजल्यापासून उपलब्ध असेल. Google Pixel 3 series मधील स्मार्टफोनदेखील उपलब्ध आहेत.

नवा मोबाईल घेणार्‍यांसाठी 25-28 मार्च दरम्यान अनेक खास सवलती उपलब्ध आहेत.