Moto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक
Motorola | (Photo Credits: Motorola)

मोटोरोला कंपनीचा स्मार्टफोन Moto G30 गेल्याच महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीचा हा बजेट रेंज स्मार्टफोन आहे. याची किंमत 10,999 रुपये आहे. मात्र युजर्सला सध्या तो अवघ्या 649 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर Moto G30 चे काही शानदार ऑफर्स दिले गेले आहेत. यामध्येच कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मोटो जी30 मध्ये 64MP चा क्वाड रियर कॅमेरा, दमदार बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसर दिला गेला आहे. तर जाणून घ्या फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल अधिक.(boAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये)

जर तुम्हाला मोटो जी30 स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फक्त 649 रुपयांत तो खरेदी करता येणार आहे. मात्र जर तुम्ही याची किंमत पाहून बुचकळ्यात पडत असाल तर फोनवर मिळणारी एक्सचेंज ऑफरवर आधारित आहे. या स्मार्टफोनची मुख्य किंमत 10,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 10,350 रुपयांच्या एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. त्यानंतर हा फोन फक्त 649 रुपयांना खरेदी करता येणार आहे. परंतु एक्सचेंज ऑफरची किंमत जु्न्या स्मार्टफोन मॉडेल क्रमांकावर अवलंबून आहे. फोन खरेदी करण्यापूर्वी एकदा जुन्या फोनचे मॉडेल क्रमांक टाकून तपासून जरुर पहा.(Oppo A74 5G स्मार्टफोन 'या' दिवशी भारतात होणार लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये)

मोटो जी30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला गेला आहे. अॅन्ड्रॉइड 11OS वर आधारित हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसवर काम करणार आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमोरी दिली गेली आहे. मोटो जी30 मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 20W टर्बो पॉवर चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. फोनमध्ये चार रियर कॅमेरा दिले गेले आहेत. याचा प्रायमरी सेंसर 64MP चा आहे. तर यामध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MPचा डेप्थ सेंसर दिला गेला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 13MP चा आहे.