Oppo A74 5G (Photo Credits: Twitter)

ओप्पोचा (Oppo) नवा स्मार्टफोन Oppo A74 5G हा लवकरच भारतात लाँच होणार आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर पेजवर याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर (Amazon India) हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर यात पंच होल डिझाईन डिस्प्ले सुद्धा असेल.त्यामुळे सर्व ओप्पो प्रेमींना या स्मार्टफोनविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

याआधी Oppo A74 5G स्मार्टफोन कम्बोडिया आणि थायलंडमध्ये लाँच करण्यात आला. थायलंडमध्ये या स्मार्टफोनची किंमत THB 8,999 (जवळपास 21,000 रुपये) इतकी आहे.हेदेखील वाचा- Reliance Jio च्या 70 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्पेशल रिचार्जवर मिळवा फ्री कॉल आणि 24GB डेटा

Oppo A74 5G च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची FHD+ डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिजोल्युशल हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याचबरोबर यात अमोल्ड डिस्प्ले असू शकते. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर वापरण्यात आले आहे. Oppo A74 5G च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा रियर कॅमेरा असेल. तर 2MP चे दोन कॅमेरे मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP चा कॅमेरा मिळेल.

या स्मार्टफोनच्या बॅटरी विषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये ड्युल बँड 5G नेटवर्क सपोर्ट दिले गेले आहेत. हा फोन ड्युल सिम कार्डला सपोर्ट करेल.