boAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
boAt (Photo Credits: Wikimedia Commons)

टेक्नोलॉजीच्या दुनियेत आपले एकाहून एक जबरदस्त गॅजेट्स आणून लोकप्रिय झालेली कंपनी boAt ने आपले जबरदस्त स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xplorer असे या स्मार्टवॉचचे नाव असून हा तीन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. पिच ब्लॅक, ग्रे आणि ऑरेंज फ्युजन या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचची टक्कर Amazfit Bip U Pro आणि Realme Watch शी होईल. मार्च महिन्यात Boat कंपनीने भारतात आपले नवे स्मार्टवॉच (Smartwatch) लाँच केले आहे. Boat Flash Watch असे या स्मार्टवॉचचे नाव असून यात 10 स्पोर्ट्स मोड आणि अनेक हेल्थ फिचर्स दिले आहेत.

boAt Xplorer स्मार्टवॉचची किंमत 5,990 रुपये आहे. मात्र ऑफरमध्ये हा वॉच 2,999 रुपयात उपलब्ध आहे. त्याचबरोबर यात 1 वर्षाची वॉरंटीही दिली आहे.हेदेखील वाचा- WhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे

या स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 1.29 इंचाची डिस्प्ले दिली आहे. यात 5ATM वॉटरप्रुफ फीचर देण्यात आले आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ 4.2, जीपीएस सेंसर सारखे फिचर्स मिळतात. हा स्मार्टवॉच ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 210mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यावर 10 दिवस बॅटरी चालते. तर 30 दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळेल.

या स्मार्टवॉचमध्ये अनेक ट्रेकिंग मोड दिले आहेत. वॉकिंग, रनिंग, स्विमिंग सारखे मोड देण्यात आले आहेत. त्याशिवाय यात कॉलिंग अलर्ट, म्यूजिक कंट्रोल फिचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात हार्ट रेट मॉनिटरिंग सेंसरसुद्धा दिला आहे. महिलांसाठी यात पीरियड्स ट्रॅकसुद्धा दिला आहे.

दरम्यान Boat चे शानदार Airpods 621 टू वायरलेस स्टेरिओ ईअरफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. या ईअरफोनच्या बॅटरी संदर्भात असा दावा करण्यात आला आहे की, 150 तासांचा बॅकअप दिला जाणार आहे. ऐवढेच नव्हे तर या ईअरफोनचे कवर पॉवर बँकच्या रुपात उपयोग करु शकतात. अन्य फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास Airpods 621 मध्ये गुगल सिरी वॉइस असिस्टंटसह बेस ड्रायव्हर्स, ब्लूटुथ वर्जन 5.0 आणिIWP तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळणार आहे