WhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

WhatsApp कडून IOS युजर्ससाठी दोन मोठे बदल केल्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट अपडेटनुसार युदर्जला प्री-व्यू मोड (Preview Mode) मध्ये फोटो आणि व्हिडिओ मोठ्या आकारात दिसून येणार आहेत. व्हॉट्सअॅपने आपल्या नव्या अपडेटसग Disappearing Message फिचरमध्ये सुधारणा केली आहे. तर हे सर्व नवे अपडेट WhatsApp चे लेटेस्ट 2.21.71 IOS वर्जनसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र अॅन्ड्रॉइड युजर्सला यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आतापर्यंत व्हॉट्सअॅप यजुर्सला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना प्री-व्यू फोटो आणि व्हिडिओ लहान दिसून येत होते. मात्र आता तेच अपडेट नंतर मोठ्या आकारात दिसून येत आहेत. लीक रिपोर्ट्सनुसार, हे फिचर लवकरच अॅन्ड्रॉइड युजर्सला सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मात्र याच्या लॉन्चिंग तारखेबद्दल कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही.(Google Assistant च्या मदतीने मिळवा हरवलेला iPhone; काय आहे हे फिचर? जाणून घ्या)

आतापर्यंत व्हॉट्सअॅप ग्रुप मेसेजचे सर्व अधिकार अॅडमिनकडे होते. परंतु नव्या अपडेटनुसार डिसअपियरिंग मेसेज कंट्रोल फिचरचा अधिकार ग्रुप मधील अन्य युजर्सकडे सुद्धा असणार आहेत. दरम्यान एकाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल किंवा काढून टाकायचे असल्यास याचे अधिकार मात्र अॅडमिनकडे असणार आहेत. त्याचसोबत ग्रुप अॅडमिन सेटिंग बदलून Only Admin असे सुद्धा करु शकतो. तर डिसअपियरिंग मेसेच फिचर हे गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आले होते.

डिसअपियरिंग फिचर ऑन केल्यानंतर चॅट करण्यात आलेले मेसेज पुढील सात दिवसात आपोआप डिलिट होणार आहेत. व्हॉट्सअॅपने हे फिचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅटसाठी उपलब्ध करुन दिले होते. डिअरपियरिंग मेसेज फॉरवर्ड करता येत नाही. मात्र मेसेज कॉपी करता येतो. त्याचसोबत स्क्रिनशॉट ही त्या मेसेजचा घेता येतो. हे फिचर तुम्ही मॅन्युअली ऑन किंवा ऑफ करु शकता.