Google Assistant च्या मदतीने मिळवा हरवलेला iPhone; काय आहे हे फिचर? जाणून घ्या
Apple iPhone (Photo Credits: Apple)

आजकाल आयफोन (iphone) हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळे सामान्यांना देखील आपल्या खिशात आयफोन असावा, अशी इच्छा असते. काहींचे तर आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते. अशावेळी अत्यंत कष्टाने घेतलेला आयफोन हरवला तर? यावेळी गुगल असिस्टंट तुमच्या मदतीला धावून येईल. गुगल लवकरच गुगल असिस्टेंट (Google Assistant) मध्ये एक नवे फिचर समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. या फिचरमुळे तुम्ही हरवलेला आयफोन परत मिळवू शकता. अॅनरॉईड युजर्स (Android Users) खूप काळापासून या फिचरचा उपयोग करत आहेत. मेकरुमर्स च्या रिपोर्टनुसार, यात 'अॅपल ऑन फाईंड माय सिस्टम' (Apple On Fine My System) सारखे वैशिष्ट्य असेल. हे खास आयफोनसाठी सादर करण्यात येणार आहे. (iphone संदर्भात कंपनी घेऊन येणार नवी योजना, फोन ट्रॅक करण्यासाठी युजर्सची घ्यावी लागणार परवानगी)

आयओएस (iOs) साठी गुगल असिस्टंट समर्थित स्मार्ट स्पीकर आणि गुगल होम अॅप असलेले युजर्सच या फिचरचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे युजर्स आपल्या हरवलेले डिव्हाईस शोधू शकतात. गुगल स्मार्ट होम डिव्हाईसच्या मदतीने गुगल, फाईंड माय फोन असे विचारल्यावर अलर्ट पाठवण्यात येईल. त्यानंतर गुगल होम अॅप आयफोनवर आयओएस क्रिटिकल अलर्ट पाठवेल. (Apple कंपनी लवकरच बाजारात आणणार Foldable iPhone, काय असणार याची खास वैशिष्ट्ये)

स्पेशल नोटिफिकेशन्सच्या रुपात पाठवण्यात आलेले अलर्ट वाचण्याची क्षमता अॅपलमध्ये असेल. ज्याला सायलेंस मोड किंवा डू नॉट डिस्टर्ब च्या माध्यमातून ब्रेक केले जाईल. त्यामुळे आयफोन युजरपर्यंत पोहण्यास मदत होईल. दरम्यान, क्रिटिकल अलर्ट अॅप्ससाठी अॅप्पलकडून विशेष मंजूरी घ्यावी लागते आणि गुगलने ही मान्यता प्राप्त केली असल्याची माहिती समोर येत आहे.