iphone संदर्भात कंपनी घेऊन येणार नवी योजना, फोन ट्रॅक करण्यासाठी युजर्सची घ्यावी लागणार परवानगी
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Apple कंपनीने iphone स्मार्टफोन ट्रॅकिंग करणे अधिक मुश्किल करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. कंपनी मार्च-एप्रिल पर्यंत या संदर्भातील एक नवी प्रायव्ही कंट्रोल आणू शकते. या प्रायव्हसी कंट्रोलला गेल्याच वर्षात आणण्याची तयारी केली गेली होती. पण चहूबाजूंनी दबावानंतक कंपनीने ती पुढे ढकलली. खरंतर फेसबुक सह अन्य काही डिजिटल सर्विस देणारे अॅप जाहिरांतींसाठी युजर्सला ट्रॅक करतात. पण नवी प्रायव्हसी कंट्रोल लागू केल्यानंतर कोणत्याही अॅपला फोन ट्रॅक करण्यासाठी युजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे. नवी प्रायव्हसी संजर्भात अॅपल आणि फेसबुक मध्ये सध्या वाद सुरु आहेत. गेल्या महिन्यात फेसबुकने न्यूयॉर्क टाइम्सच्या वॉल स्ट्रिट जर्नल सह काही वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देत या बद्दल आलोचना केली होती.

प्रायव्हसी कंट्रोलची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्यानंतर फेसबुकचे सीईओ मार्कजुकरबर्ग यांनी अॅप्पला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले की, अॅप्पल दावा करत आहे की, नव्या पॉलिसीमुळे लोकांची मदत होणार आहे. परंतु फेसबुक अॅप्पलच्या या नव्या प्रायव्हसीमुळे नाराज असल्याचे दिसून आले आहे.(Apple लवकरच घेऊन येणार स्वस्त 5G iphone, एप्रिल मध्ये बाजारात येण्याची शक्यता पण किंमतीसह स्पेसिफिकेशन लीक)

जुकरबर्ग यांनी पुढे असे म्हटले आहे की, आयमेसेज हे त्यांचे स्वत:चे आहे. ते सर्व आयफोनमध्ये इंन्स्टॉल करण्यात येतेच. हेच कारण आहे की, अमेरिकेत आयमॅसेज सर्वाधिक वापर करणारे अॅप आहे. फेसबुकचे सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी सुद्धा अॅप्पल कंपनीच्या या पावलावर निशाणा साधत असे म्हटले की, आम्ही अॅप्पलच्या नव्या फिचरच्या कारणामुळे प्रभावित होणाऱ्या लहान उद्योगजकांची चिंता दूर करण्यासाठी पर्याय शोधत आहोत.