Apple लवकरच घेऊन येणार स्वस्त 5G iphone, एप्रिल मध्ये बाजारात येण्याची शक्यता पण किंमतीसह स्पेसिफिकेशन लीक
Apple iPhone. (Photo Credits: IANS)

प्रीमियम स्मार्टफोन कंपनी Apple लवकरच त्यांचा अपकमिंग स्मार्टफोन iphone SE Plus लॉन्च करु शकतो. हा फोन येत्या एप्रिल महिन्यात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीचा स्वस्त 5G स्मार्टफोन असणार असल्याचे बोलले जात आहे. iphone SE (2020) स्मार्टफोन गेल्या वर्षात एप्रिल महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. पण आयफोन एसई प्लसच्या लॉन्चिंग पूर्वी फोनची किंमत आणि फिचर्स बद्दल खुलासा करण्यात आला आहे. टिप्सटस Apple Lab च्या नुसार, iphone SE Plus स्मार्टफोन जवळजवळ 499 डॉलर (36,600 रुपये) लॉन्च केला जाऊ शकतो. जो आयफोन एसई (2020) मॉडेलच्या किंमती पेक्षा अधिक असणार आहे.

gizchina च्या रिपोर्ट्सनुसार, Apple iPhone SE Plus मध्ये वाइड नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.1 इंचाचा मोठा IPS डिस्प्ले मिळू शकतो. iPhone SE (2020) च्या तुलनेत आयफोन एसई प्लसमध्ये काही फिजिकल होम बटण दिले जाणार नाही आहे. iPhone SE Plus मध्ये थिक बेजल सपोर्ट मिळणार आहे. फोन तीन रंगात ब्लॅक, रेड आणि व्हाइट मध्ये येणार आहे. जर प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये Apple A13 Bionic किंवा Apple A14 Bionic चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनची चिप मोड्युल मोड 5G फंक्शनला सपोर्ट करणार आहे. जो A13 Bionic मध्ये नाही आहे.(Vivo Y20G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, 5000mAh बॅटरी आणि 3 कॅमेरे असलेल्या या फोनच्या किंमतीविषयी घ्या जाणून)

फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाल्यास, Apple iPhone SE Plus स्मार्टफोनमध्ये सिंगल फ्रंट आणि रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याचा रियर कॅमेरा 12MP चा असणार आहे. तर सेल्फीसाठी 7MP चा कॅमेरा आणि फोनमध्ये रियर कॅमेऱ्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि 6 पोट्रेट लाइटचा इफेक्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये IP67 सपोर्टस येणार आहे. म्हणजेच पाणी आणि धुळीत लवकर खराब होणार नाही आहे. फोनमध्ये टच आयडीचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनच्या साइडमध्ये पॉवर बटण आणि फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट मिळणार आहे.