Moto E7 Power स्मार्टफोन भारतात 19 फेब्रुवारीला होणार लॉन्च, वेबसाइटवर काही खास फिचर्ससह झाला लिस्ट
Moto e7 Power (Photo Credits-Twitter)

Moto E7 Power स्मार्टफोनच्या लॉन्चिंग तारखेबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारतीय बाजारात बजेट रेंज स्मार्टफोन 19 फेब्रुवारीला लॉन्च केला जाणार असून एक्सक्लूसिवली ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सेलसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनसाठी मायक्रो साइट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. तेथे लॉन्चिंग तारीख ते फिचर्स बद्दल खुलासा करण्यात आला आहे. Moto E7 Power स्मार्टफोनमध्ये खास फिचर्समध्ये 5,000mAh ची पॉवरफुल बॅटरी आणि 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाणार आहे.

मोटो ई7 पॉवर स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट झाला आहे. तेथे दिलेल्या माहितीनुसार, तो 19 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे. लिस्टिंच्या मते कंपनी ही सिंगल स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करणार असून त्यात 4GB रॅमसह 64GB इंटरनल स्टोरेजसह येणार आहे.(Facebook कडून लॉन्च केले जाणार नवे स्मार्टवॉच, Apple कंपनीला टक्कर देणारे ठरणार) 

Tweet:

स्मार्टफोनच्या लॉन्चिंगपूर्वी काही फिचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली असून तो 4GB रॅमसह बाजारात उतरवला जाणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 64GB चा इंटरनल स्टोरेज ही मिळणार आहे. यामध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार असून जो 720X1600 पिक्सलच्या स्क्रिन रेज्यॉल्यूशनसह येणार आहे. फ्लिपकार्टवर फोनची इमेज सुद्धा दिली गेली असून तो ब्लू रंगाच्या वेरियंटमध्ये दिसून येत आहे. त्याचसोबत बॅक पॅनलवर रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर ही दिले आहेत.(भारतात लाँच झाला Infinix Smart 5 स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत ऐकून तुम्हाला बसेल सुखद धक्का)

फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप ही दिला आहे. जो वर्टिकल डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगच्या मते यामध्ये 13MP चा प्रायमरी सेंसर दिला आहे. या व्यतिरिक्त साइड पॅनल वॉल्यूम आणि पॉवर बटण दिले गेले आहे. हा फोन स्टॉक अॅन्ड्रॉइड ओएसवर आधार असणार आहे. तो MediaTek Helio P22 चिपसेटवर उतरवला जाऊ शकतो.