Facebook कडून लॉन्च केले जाणार नवे स्मार्टवॉच, Apple कंपनीला टक्कर देणारे ठरणार
Facebook | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Facebook Inc आपल्या नव्या स्मार्टवॉचवर काम करत आहे. याचे लॉन्चिंग पुढील वर्षात 2020 होऊ शकते. त्यामुळे स्मार्टवॉचची विक्री पुढील वर्षात होईल अशी अपेक्षा आहे. फेसबुकचे नवे स्मार्टवॉच सेकेंड जनरेशनचे स्मार्टवॉच असणार आहे. याची टक्कर अॅप्पलच्या स्मार्टवॉचसोबत होणार आहे. अद्याप फेसबुक कडून या स्मार्टवॉच बद्दल खुलासा करण्यात आलेला नाही. लीक झालेल्या रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की, फेसबुक आपल्या स्मार्टवॉचसाठी स्वत:चे ऑपरेटिंग सिस्टम विकसित करण्याची तयारी करत आहे.(Apple Days Sale 2021 मध्ये iPhone 12 Mini, iPhone 11, iPad आणि अॅपल वॉच वर आकर्षक डिस्काऊंट)

रॉयटर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकचे स्मार्टवॉच मधून युजर्सला मेसेज पाठवता येणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टवॉचमध्ये काही कम्युनिकेशन फिचर्स सुद्धा दिले आहेत. त्याचसोबत स्मार्टवॉचमध्ये काही आरोग्य आणि फिटनेस फिचर्स सपोर्टसह येणार आहे. सध्या मार्केटमध्ये Apple Inc आणि Huawei चे स्मार्टवॉच अधिक विक्री केले जात आहेत. अशातच फेसबुकची या कंपन्यांसोबत थेट टक्कर होणार आहे.(WhatsApp Upcoming Features: व्हॉट्सअॅप मध्ये युजर्संना लवकरचं मिळणार नवीन फिचर ; व्हिडिओ पाठवण्याआधी करता येणार Mute आणि Edit)

फेसबुकचे स्मार्टवॉच एक सेलुलर कनेक्शनच्या माध्यमातून काम करणार आहे. ज्याच्या माध्यमातून युजर्सला मेसेज पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. फेसबुकची पहिली नॉन हार्डवेअर कंपनी ठरणार जी आपले स्वत:चे स्मार्टवॉच विकसित करणार आहे. लीक रिपोर्ट्स नुसार, फेसबुकच्या नव्या स्मार्टवॉचसाठी Oculus VR सह हातमिळवणी करु शकते. त्याचसोबत फेसबुकने Ray Ban सह हातमिळवणी करत स्मार्ट ग्लास तयार करण्याच्या दृष्टीकोनातून काम करत आहे.