Flipkart Bonanza Sale: फ्लिपकार्टवर 19 ते 23 ऑगस्ट दरम्यान मोबाईल बोनान्झा सेलला सुरूवात, रिअलमीच्या मोबाईलवर मिळतेय 6000 हजारांपर्यंत सूट
Flipkart (PC - PTI)

फ्लिपकार्टवरील (Flipkart) विक्रीचा हंगाम अजून संपलेला नाही. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टने पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवर मोबाईल बोनान्झा (Mobile Bonanza Sale) विक्री सुरू केली आहे. ही विक्री 19 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. हा सेल 23 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. या काळात ई-रिटेलर्स अनेक ऑफर्स (Offers) आणि नो कॉस्ट ईएमआय (No cost EMI) देखील देत आहेत. या व्यतिरिक्त, तुम्हाला एक्सचेंज ऑफर, HDFC बँक कार्डवर 5 टक्के झटपट सूट देखील मिळते. सेल दरम्यान तुम्हाला रिअलमी स्मार्टफोनवर (Realme smartphones) बंपर सवलत मिळू शकते. कंपनीने येथे  रिअलमी 7 Pro, रिअलमी C20 आणि रिअलमी X7 वर बंपर सवलत जाहीर केली आहे. कंपनीने या ऑफर्स रिअलमीला दिल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल पण काही कारणास्तव तुम्हाला फोन घेता आला नाही, तर तुमच्यासाठी फोन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

या सेलमध्ये 6000 रुपयेपर्यंतची सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट आणि Realme.com वरून रिअलमी X3 SZ खरेदी केले तर तुम्हाला सूट मिळेल. त्याची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, कंपनी फ्लिपकार्ट आणि Realme.com वर डिस्काउंटसह रिअलमी 7 Pro देखील ऑफर करत आहे. येथे तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळते. या फोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे. तर दुसरीकडे रिअलमी X7 Pro 5G वर 3000 रुपयांची सूट देखील आहे.  त्याची किंमत 26,999 रुपये आहे. याशिवाय, तुम्हाला रिअलमी X7 आणि X7 Max 5G वर 2000 रुपयांची सूट देखील मिळू शकते. तुम्हाला ते फ्लिपकार्ट आणि realme.com या दोन्ही ठिकाणी मिळू शकेल. त्याची किंमत 14,999 आणि 24,999 रुपयांपासून सुरू होते. हेही वाचा Jammu-Kashmir Update: काश्मीरच्या अवंतीपोरातील पम्पोर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 1 दहशतवादी ठार

रिअलमी फ्लिपकार्ट आणि realme.com वर रिअलमी Narzo 30 Pro स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 8GB रॅम व्हेरिएंटच्या खरेदीवर 1,000 रुपयांची सूट देखील देत आहे. 6 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे, तर 8 जीबी व्हेरिएंटची किंमत भारतात 18,999 रुपये आहे.

रिअलमी C20 च्या खरेदीवर 1,000 ची सूट. पण ही ऑफर फक्त फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. Realme.com वर, स्मार्टफोन निर्माता कंपनी फक्त 500 रुपयांची सूट देत आहे. भारतात रिअलमी C20 ची किंमत 7,499 रुपये आहे. शेवटी, कंपनी फ्लिपकार्टवर रिअलमी 8 5G च्या खरेदीवर 500 रुपयांची सूट देत आहे. भारतात 14,449 रुपयांपासून सुरू होते आणि देशभरात 17,499 रुपयांपर्यंत जाते.