Microsoft: विंडोजसाठी लवकरच होणार 'एक्सबॉक्स गेम स्ट्रिमिंग' अॅप
माइक्रोसॉफ्ट ( photo credit : pixabay )

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आधुनिक तंत्रज्ञानासह नवे प्रयोग करत असतात. याच दरम्यान, कथित रुपात विंडोज पीसीसाठी आपल्या एक्स बॉक्स गेम स्ट्रिमिंग अॅपला (X-box game streaming)  एक अंतिम रुप देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अॅपमध्ये कंपनीची एक्स क्लाउड सेवेमधून स्ट्रिमिंग गेम पर्यंतचा प्रवास आहे. सध्या या नव्या एक्सबॉक्स अॅप विंडोज पीसीवर गेम स्ट्रिम केला जाऊ शकत नाही. कारण सध्या एक्स बॉक्स कंसोल कंपेनियन अॅपला सपोर्ट करणार नाही आहे.(Telegram Update: टेलिग्रामने लॉन्च केले Auto-Delete Messages सह 'हे' नवे फिचर्स)

द वर्ज मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, नव्या अॅप विंडोज युजर्सला एक्स बॉक्स सीरिज मधील एस/आर कंसोल आणि एक्स क्लाउड गेल स्ट्रिम करता येणार आहे. हा अॅप पहिल्यांदाच विंडोज पीसीमध्ये एक्स क्लाउड स्ट्रिमिंग सुद्धा घेऊन येणार आहे. मायक्रोसॉफ्ट पुढील महिन्यात व्हॉट्स न्यू फॉर गेमिंग च्या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी करत आहे. यामध्ये कंपनी वेब आणि आयओएससाठी एक्स क्लाउड योजनेसंबंधित घोषणा सुद्धा करु शकते.(QR कोड न वापरता करता येईल WhatsApp Web चे लॉगिन, जाणून घ्या सोप्पी ट्रिक)

दरम्यान, नुकत्याच मायक्रोसॉफ्टने वेब आणि पीसीवर ब्राउजरच्या माध्यमातून आयओएस अॅन्ड आयपॅडओससाठी आपली स्ट्रिमिंग सेवा एक्स क्लाउडचे परीक्षण केले सुरु केले होते. अॅपलच्या बंदीमुळे कंपनी अॅप स्टोरवर आपली एक्स क्लाउड सेवा सुरु ठेवण्यास असमर्थ ठरली. हेच कारण आहे की, कंपनीने घोषणा केली आहे की आयओएसवर सफारीच्या माध्यमातून गेम स्ट्रिमिंग सेवा सुरु ठेवणार आहे.