खुशखबर : शाओमी घेऊन येत आहे जगातील पहिला 5g स्मार्टफोन; पाहा फीचर्स आणि किंमत
MiMIX3 (Photo credit : twitter)

आता इंटरनेटच्या पाचव्या पिढीसाठी तयार राहा कारण येऊ घातलय स्मार्टफोनचे 5g नेटवर्क. होय, भलेही इथे लोकांना 4g नेटवर्क व्यवस्थित मिळत नसेल, मात्र मोबाईल कंपन्या आता 5gची तयारी करत आहेत. कित्येक मोबाईल कंपन्यांनी येत्या काही महिन्यांत आपण मार्केटमध्ये 5g फोन घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे लवकरच मोबाईलधारक 5g नेटवर्कचा आनंद घेताना दिसून येणार आहेत.

पुढच्या वर्षी किमान दोन 5G फ्लॅगशिप फोन येतील, अशी अपेक्षा दूरसंचार उपकरण कंपनी क्वालकॉमचे अध्यक्ष ख्रिश्चियानो अॅमन यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच वनप्लसचे कार्ल पेई यांनी तातडीने घोषणा केली की, पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये वनप्लसचा 5G फोन बाजारात येईल. मात्र आता मिळालेल्या नवीन वृत्तानुसार, चीनची कंपनी शाओमी 25 ऑक्टोबरला बीजिंगमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात Mi Mix 3/5g स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. असे झाले तर मात्र हा जगातील पहिला 5जी फोन ठरेल.

हा फोन लॉन्च करण्याआधी कंपनीकडून वेळोवेळी फोनबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत या मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये तब्बल 10 जीबी Ram असणार आहे. या फोनमध्ये Oppo Find X सारखाच बेजल-लेस डिस्प्ले असणार आहे. या फोनला स्लाइड-आउट मेकॅनिझमसोबत सादर केले जाईल. भारतात या फोनची एंट्री कधी होईल याबाबत अजूनतरी काही ठोस माहिती मिळू शकली नाही.

फोनचे संभाव्य फीचर्स –

24+24 मेगापिक्सल ड्युअल फ्रंट कॅमेरा

स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर

या फोनमध्ये ramचे  6,8,10 असे विविध पर्याय उपलब्ध असतील.

3645 एमएएचची बॅटरी

सुपर VOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी

किंमत -

मिळालेल्या वृत्तानुसार या 5g/6gb ram/64 जीबी स्टोरेज मोबाईलची किंमत साधारण 37,500 रुपये असू शकेल.

तर 5g/6gb ram/128 जीबी स्टोरेज मोबाईलची किंमत साधारण 40,800 रुपये असू शकते.

फोनच्या 8 जीबी ram/128 जीबी स्टोरेजची किंमत 44,100 रुपये, तर 8 जीबी ram/256 जीबी स्टोरेज फोनची किंमत 47,400 रुपये असू शकते.

10 जीबी ram च्या फोनच्या किंमतीचा खुलासा अजूनतरी झाला नाही.

भारताला 5Gसाठी अद्याप बराच मोठा टप्पा पार करायचा आहे. 4जी अद्यापही व्यापक आहे, मात्र भारतात अनेक ठिकाणी आजही 3gच वापरले जात आहे.  पण 2020 पर्यंत 5जी आपल्या ग्राहकांपर्यंत पूर्णपणे पोहचलेले असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.