भारतात आधारकार्ड (Aadhaar Card) हे महत्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जाते. आधारकार्ड हे अनेक ठिकाणी ओळख किंवा कायमचा पत्ता म्हणून ग्राह्य धरले जाते. बॅंकेत खाते उघडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या कामासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. दरम्यान, अनेकांचे आधारकार्ड गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच आधार यूआयडी (UID) किंवा ईआयडी (EDI) क्रमांक आठवत नसेल, अशा आधारकार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाचे म्हणजे, आधार कार्ड हरवल्यास आपल्या स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. आपले आधारकार्ड परत मिळवण्यासाठी आवश्यक आहे. तसेच यूआयडीएआय वेबसाईट Uidai.gov.in वर हरवलेल्या आधार यूआडी किंवा ईआयडी परत मिळवण्यासाठी विनंती करू शकतात. याशिवाय, तुम्ही '1947' या हेल्पलाइन नंबरवर फोन करुन आपला आधार नोंदणी आयडी परत मिळवू शकतात. हे देखील वाचा-Aadhar Card संबंधित या दोन्ही सेवा UIDAI केल्या बंद, सविस्तर माहिती घ्या जाणून
प्रक्रिया-
- अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in वर भेट द्या
- मुख्य पृष्ठावर, माझा आधार पर्याय निवडा.
- त्यानंतर हरवलेला किंवा विसरलेला EID / UID पुनर्प्राप्त करण्याचा पर्यायावर क्लिक करा.
- आधार यूआयडी नंबर पुनर्प्राप्त करा किंवा आधार ईआयडी क्रमांक पुनर्प्राप्त करा, यापैकी आवश्यक पर्याय निवडा.
- त्यानंतर सर्व आवश्यक तपशील जसे की नाव, ईमेल आयडी, मोबाइल नंबर सबमिट करा, तसेच कॅप्चा सबमिट करा.
- सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये एक ओटीपी पाठवण्यात येईल.
- आपल्या मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी सबमिट करा आणि लॉगिनवर क्लिक करा
यापूर्वी, यूआयडीएआयने ट्वीट केले होते की, जर तुमचे आधारकार्ड किंवा नावनोंदणीची स्लिपदेखील हरवली असेल तरीही काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्ही यूआयडीएआयच्या हेल्पलाईन क्रमांक 1947 वर कॉल करून तुमची नोंदणी आयडी परत मिळवू शकतात. तसेच तुमचे आधारी यूआडी किंवा ईआयडी पुन्हा मिळवू शकतात. महत्वाचे म्हणजे, तुमचा मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी आधारशी जोडलेला असेल तर, याचा तुम्हाला अधिक फायदा होईल.