Aadhar Card संबंधित या दोन्ही सेवा UIDAI केल्या बंद, सविस्तर माहिती घ्या जाणून
Aadhaar Card (Photo Credits: PTI)

आधारकार्ड (Aadhar Card) हे आजच्या काळात एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून ग्रहीत धरले आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधारकार्डची गरज भासते. यामुळे आधार कार्डमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती अपडेट असणे सर्वांसाठी महत्वाचे ठरते. यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणकडून (UIDAI) वेळवेळी आधारकार्ड संदर्भात अपडेट दिले जाते. याचदरम्यान, यूआयडीएआने आधारकार्डशी सबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्याची माहिती दिली आहे.

यूआयडीएआयने पुढील आदेश येऊ पर्यंत अ‍ॅड्रेस वैलिडेशन लेटरद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. याआधी भाडेकरू किंवा इतर आधारकार्ड धारकांना या सुविधेमुळे सहजपणे आपला पत्ता बदलता येत होता. यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, 'पुढील आदेश येईपर्यंत पत्त्याच्या प्रमाणीकरणाच्या पत्राची सुविधा बंद करण्यात आली आहे. इतर वैध अ‍ॅड्रेस पुराव्यांच्या  या यादीतून तुम्ही तुमचा पत्ता कोणत्याही पत्त्याच्या आधारे अपडेट करू शकता. हे देखील वाचा- Twitter India सह MD मनीष माहेश्वरींच्या विरोधात तक्रार, सांप्रदायिक द्वेष पसरवल्याचा आरोप

याचबरोबर यूआयडीएआयने जुन्या शैलीमध्ये आधार कार्ड रिर्प्रिंटची सेवा बंद केली आहे. आता जुन्या कार्डाऐवजी यूआयडीएआय प्लास्टिक पीव्हीसी कार्ड जारी करते. हे कार्ड आपल्यासह नेणे सोपे आहे. हे डेबिट कार्डसारखे असून आपल्याला सहजपणे खिशात आणि पाकीटात ठेवता येते.

ट्विटरवर वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आधार हेल्प सेंटरने म्हटले आहे की, 'प्रिय निवासी, ऑर्डर आधार रीप्रिंट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी तुम्ही आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन मागवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ई-आधारचे प्रिंट आउट देखील काढू शकतात.