Lenovo (Photo Credits: Wikimedia Commons)

चीनी संगणक कंपनी लेनोव्होने (Lenovo), हॉटेलच्या लॉबीमध्ये लघवी केल्याबद्दल त्यांच्या एका संगणक सेल्समनला नोकरीवरून काढून टाकले. यामुळे चिडलेल्या सेल्समनने आता कंपनीकडे कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. सेल्समनचे म्हणणे आहे की, त्याचे हॉटेलच्या लॉबीमध्ये लघवी केल्याचे कृत्य जाणूनबुजून घडले नाही, तर त्याला लघवीच्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे ही घटना घडली. सेल्समनच्या म्हणण्यानुसार, कंपनीलाही त्याच्या आजाराची माहिती होती. मात्र त्यावर कोणतीही सुनावणी न झाल्याने, त्याला चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्यात आले. आता या कर्मचाऱ्याने नुकसान भरप[ईचिओ मागणी केली आहे, तसेच कंपनीविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील आहे. या ठिकाणी 66 वर्षीय रिचर्ड बेकर यांनी, 23 ऑगस्ट रोजी लेनोवो कंपनीच्या अमेरिकन शाखेविरुद्ध न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून, त्यासाठी त्यांना कंपनीकडून 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 12.5 कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्यात यावी.

रिचर्ड यांनी कंपनीवर, ‘न्यूयॉर्क राज्य आणि न्यूयॉर्क शहराच्या मानवी हक्क कायद्यांचे उल्लंघन करून अपंगत्वाच्या आधारावर भेदभाव केल्याचा’ आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काम संपल्यानंतर रात्रीचे जेवण करून, ते न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरजवळील हॉटेलमध्ये परतत होते. त्यावेळी त्यांना लघवीची समस्या उद्भवली. ते टॉयलेटपर्यंत पोहोचू शके नाहीत आणि त्यांनी लॉबीच्या शेजारच्या भागात लघवी केली. (हेही वाचा: Infosys Delays Hiring Freshers: इन्फोसिसने 2022 मध्ये दिले 2,000 फ्रेशर्सना ऑफर लेटर, मात्र अजूनही झाले नाही जॉईनिंग; NITES ची सरकारला कंपनीवर कठोर कारवाई विनंती)

या वेळी तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या एका सहकाऱ्याने रिचर्डबाबत कंपनीच्या एचआरकडे तक्रार केली. त्यांच्यावर टाइम्स स्क्वेअर हॉटेलच्या लॉबीमध्ये जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्णपणे लघवी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. रिचर्ड सांगतात, त्यांच्या मूत्राशयात समस्या आहे. या आजारामुळे ते लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. कंपनीला याची जाणीव होती. 2016 पासून ते मूत्राशयाशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर उपचारही सुरू आहेत. मात्र तरीही त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले.