
Mighty Kingdom Layoffs: ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या गेम डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या माईट किंगडमने धोरणात्मक निर्णयांमुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन व्हिडिओ गेम डेव्हलपरने सांगितल्या प्रमाणे ते, सध्या "कठीण काळाचा" चा सामना करत आहे. कंपनीने काही भूमिकांची पुनर्रचना करण्यास सुरुवात केल्याने टाळेबंदीचा परिणाम म्हणून 28% कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे.(हेही वाचा: Tesla Layoffs: टेस्ला टाळेबंदी, कंपनीच्या पुनर्रचनेत हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या)
टाळेबंदीच्या घोषणेपूर्वी, मायटी किंगडमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिन यिन यांनी कंपनीच्या प्रवासावर त्यांचे मत मांडताना '2010 पासून, कंपनीने जगभरातील 50 दशलक्षाहून अधिक खेळाडूंना गेमींगची सेवा दिल्याचे म्हटले. गेम्समध्ये अधिक रूची वाढवण्यासाठई प्रयत्नशील असल्याचे म्हटले. आमची टीम कामाप्रती सर्जनशीलता आणि समर्पणाचा पुरावा आहे.'
पुढे, डेव्हिन यिन म्हणाले की मायटी किंगडममध्ये टाळेबंदी सुरू करण्यात आली कारण, कंपनीने आपले ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि "मुख्य व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी" "स्ट्रॅटेजिक राइटायझिंग" बद्दल सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, मुख्य कमांवर लक्ष केंद्रित करणे कंपनीच्या भविष्यासाठी चांगले ठरेल. डेव्हिन यांनी हायलाइट केले की मायटी किंगडममध्ये टाळेबंदीमुळे 28% कर्मचारी कपात होईल.
मायटी किंडगॉमच्या टाळेबंदीचा निर्णय जड अंतःकरणाने घेण्यात आला, असे सीईओ डेव्हिन यिन यांनी सांगितले. कंपनीला असा निर्णय घ्यायचा नव्हता. मात्र, तयाव्यतिरिक्त कोणताच पर्याय नव्हता असे ते म्हणाले. एवढी वर्षे काम करून कंपनीला यश मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. मायटी किंगडममध्ये टाळेबंदी असूनही, डेव्हिड यिन म्हणाले की कंपनी स्थिर राहील आणि एक आनंददायी गेमिंग अनुभव तयार करण्याचे आपले ध्येय पुढे चालू ठेवेल, असे ते म्हणाले.
जागतिक बाजारपेठ, विशेषत: टेक, इलेक्ट्रिक वाहने, फिनटेक, हेल्थ टेक आणि इतर उद्योग, जागतिक आर्थिक मंदी, मागणी कमी होणे अशी आव्हाने आहेत.