खुशखबर! आज होणार JioPhone 2 चा सेल; इथे खरेदी करू शकाल हा फोन, पहा फीचर्स
Jio Phone 2 (Photo Credits: Twitter)

जर आपण अद्याप रिलायन्स जियोफोन 2 (JioPhone2) खरेदी करू शकला नसाल तर याबाबत चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कारण आज पुन्हा एकदा जिओ हा फोन लोकांना उपलब्ध करून देणार आहे.  आज, 7 मार्च दुपारी 12 वाजता या फोनचा सेल सुरु होणार आहे. हा फोन तुम्ही कंपनीची वेबसाईट jio.comवर खरेदी करू शकता. मागच्या वर्षी कंपनीने हा फोन लॉन्च केला होता आणि या फोनमुळे जिओची लोकप्रियता अजूनच वाढली होती. या फोनची किंमत फक्त 2,999 रुपये इतकी आहे. यामध्ये जर का तुम्ही 49 रुपये, 99 रुपये आणि 153 रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटाचा लाभ घेतला येईल, ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवस असणार आहे.

JioPhone2 मध्ये पूर्ण कीबोर्डसह हॉरिझोंटल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. पूर्ण कीबोर्डमध्ये क्वार्टी कीपॅड असणार आहे, ज्यामुळे टाइपिंग करणे बरेच सोपे झाले आहे. या फोनमध्ये तुम्हाला 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 एमबीची रॅम मिळेल. यात तुम्हाला 4 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल, जो तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत वाढवू शकाल. कॅमेराबदल बोलायचे झाले तर, फोनमध्ये रियर 2 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल तर सेल्फीसाठी या मोबाईलमध्ये व्हीजीए (VGA) कॅमेरा असेल. हा फोन वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि एफएम यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. (हेही वाचा: नवीन वर्षांत JIO ची अनोखी सर्व्हिस; आता नेटवर्क नसतानाही कॉल करणे होणार शक्य)

JioPhone 2 मध्ये 2,000 mAh ची बॅटरी असणार आहे आणि हा फोन KAI ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टंटसाठी एक खास डेडिकेटेड बटण असेल. हा फोन 24 भारतीय भाषांमध्ये कार्य करेल. तसेच हा  व्हॉइस कमांडलादेखील सपोर्ट करेल. या फोनमध्ये WhatsApp आणि Youtube सारखे फीचरदेखील आहेत.