Reliance Jio 5G Network: Jio 5G नेटवर्क सेवा देशभरातील 184 शहरांमध्ये लॉन्च; 50 शहांमध्ये Rollout
5G internet | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

रिलायन्स जिओने मंगळवारी देशातील 50 शहरांमध्ये सर्वात मोठी ट्रू 5G सेवा लॉन्च (Jio True 5G Services) करण्याची घोषणा केली. दरम्यान, ही घोषणा करण्यापूर्वीच देशातील सुमारे 184 शहरांमधील जिओ वापरकर्ते आता पाचव्या पिढीतील मोबाइल सेवांचा (5G Services) आनंद घेत आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 5G जी सेवा लॉन्च झालेल्या शहरांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडू आदी राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यात कोल्हापूर, नांदेड-वाघाळा, सांगली आदी ठिकाणी Jio True 5G सेवा सुरू रहोत आहे. (हेही वाचा, Reliance Jio 5G Network: भारतामधील 100 हून अधिक शहरांमध्ये पोहोचली 5जी सेवा; जाणून घ्या महाराष्ट्रात कुठे सुरु आहे)

जिओ कंपनीने माहिती देताना सांगितले की, आम्ही 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 50 अतिरिक्त शहरांमध्ये Jio True 5G सेवा सुरू करत आहोत. ही संख्या आम्ही आता एकूण संख्या 184 शहरांवर नेली आहे. ही केवळ भारतातच नव्हे तर 5G सेवांच्या सर्वात मोठ्या रोलआउट्सपैकी एक आहे. या शहरांमधील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps पर्यंत अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी Jio वेलकम ऑफरमध्ये आमंत्रित करण्यात येत आहे.

जिओने पुढे म्हटले आहे की, कंपनीने देशभरात ट्रू 5G रोल-आउटचा वेग आणि तीव्रता वाढवली आहे. नववर्ष 2023 मध्ये प्रत्येक Jio वापरकर्त्याने Jio True 5G तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय फायद्यांचा आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे. संपूर्ण देश आनंद घेऊ शकेल आणि लाभ घेऊ शकेल. डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील सर्व वापरकर्त्यांना Jio True 5G सेवेचा लाभ घेता येणे शक्य व्हावे असा आमचा प्रयत्न आहे.