Jio Happy New Year Offer: जिओ कडून नव्या वर्षात युजर्ससाठी गिफ्ट, 2545 रुपयांच्या रिचार्ज मध्ये मिळणार 29 दिवसांची अधिक वॅलिडिटी
Reliance Jio (Photo Credit: Facebook)

Jio Happy New Year Offer: टेलिकॉम कंपन्यांनी युजर्सला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध रिचार्जचे प्लॅन लॉन्च करत आहे. जिओने नव्या वर्षापूर्वी टेरिफ मध्ये बदल करत ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. जिओने हॅप्पी न्यू इअर (Happy New Year Offer) लॉन्च केले आहे. त्यामुळे जर तुम्ही 2545 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 365 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. याआधी या रिचार्जमध्ये 330 दिवसांची वॅलिडीटी होती. तसेच संपूर्ण वर्षभर 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.

जिओच्या मते जर जर एखाद्या युजरने या ऑफर अंतर्गत रिचार्ज केल्यास त्याला अधिक 29 दिवसांची वॅलिडीटी मिळणार आहे. ही ऑफर 2 जानेवारी 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिडेट वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएसची सुविधा मिळणार आहे.(WhatsApp Adopts Villages in India: महाराष्ट्र, कर्नटक राज्यातील 500 गावे व्हाट्सअ‍ॅपने घेतली दत्तक, डिजिटल पेमेंटला देणार चालणा)

जिओच्या या पॅकमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सावन म्युझिकसह अन्य अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ही ऑफर जिओची वेबसाईटसह MyJio अॅपवर उपलब्ध आहे.(Infinix ने भारतात लाॅन्च केले दोन दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक)

रिलायन्स जिओने नुकत्याच 1 रुपयांच्या किंमतीत सर्वाधिक स्वस्त रिचार्च प्लॅन आणला होता. यामध्ये 10MB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन ज्या युजर्सला अधिक डेटाचा वापर करायचा नाही त्याच्यासाठी फायदेशीर आहे.