Jio Fiber च्या 'या' 4 प्लॅनमध्ये 15 ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन
Jio Fiber | File Image

रिलायन्स जिओचे (Reliance Jio) अनेक प्रीपेड (Prepaid), पोस्टपेड (PostPaid), जिओफोन (JioPhone) आणि जिओफायबर (Jio Fiber) प्लॅन्स आहेत. यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवेनव्या ऑफर्स दिल्या जातात. जिओ फायबरच्या 4 प्लॅन्समध्ये तब्बल 15 ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे. त्याचबरोबर अनलिमिडेट डेटाही मिळत आहे. 1499, 2499, 3999 आणि 8499 रुपये असे हे चार प्लॅन्स आहेत. जाणून घेऊया त्यात मिळणारे फायदे... (Reliance Jio चे बेस्ट रिचार्ज प्लॅन्स; No Limit Data चा घ्या लाभ)

1499 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यात अनलिमिडेट डेटा मिळणार असून युजरला 300mbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्याचबरोबर फ्री व्हाईस कॉलिंग आणि 15 ओटीटी अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये अॅमेझॉन प्राईम, डिज्नी प्लस हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5, वूट सिलेक्ट, अल्ट बालाजी, जिओ सिनेमा यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. यासोबतच युजरला नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन देखील मिळेल.

2499 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यात अनलिमिडेट डेटा मिळणार असून युजरला 500mbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्याचबरोबर फ्री व्हाईस कॉलिंग आणि 15 ओटीटी अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यात नेटफ्लिक्सचा स्टँडर्ट प्लॅन मिळणार आहे.

3999 रुपयांचा प्लॅन: 

या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यात अनलिमिडेट डेटा मिळणार असून युजरला 1Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्याचबरोबर फ्री व्हाईस कॉलिंग आणि 15 ओटीटी अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यातही नेटफ्लिक्सचा स्टँडर्ट प्लॅन देण्यात आला आहे.

8499 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यात 6600GB डेटा मिळणार असून युजरला 1Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. त्याचबरोबर फ्री व्हाईस कॉलिंग आणि 15 ओटीटी अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यात नेटफ्लिक्सचा प्रिमियम प्लॅन देण्यात आला आहे.

याशिवाय जिओ फायबरचे 999, 699, 399 रुपयांचे तीन वेगळे प्लॅन्सही आहेत. मात्र यातील केवळ 999 रुपयांच्या प्लॅन्समध्ये तुम्हाला ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन मिळेल.