JioBharat V2 4G Phone: आता Amazon वर खरेदी करू शकता जिओचा 4जी फोन; किंमत फक्त 999 रुपये, जाणून घ्या फीचर्स
JioBharat 4G phone (Photo Credits: Jio.com)

रिलायन्स जिओने Jio Bharat V2 4G फोन जुलै महिन्यात लॉन्च केला होता. त्यावेळी या फोनच्या किमतीमुळे तो बराच चर्चेत आला होता. आता रिलायन्स एजीएम 2023 दरम्यान या फोनचा सेल जाहीर करण्यात आला आहे. आजपासून अवघ्या 999 रुपयांमध्ये तुम्ही हा फोन विकत घेऊ शकता. भारतात अजूनही मोठ्या संख्येने लोक 2G फोनवर अवलंबून आहेत. अशात Jio Bharat V2 4G या स्वस्त फोनद्वारे जे लोक अजूनही 2G वापरत आहेत त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचे जिओचे लक्ष्य आहे. अशा यूजर्ससाठी कंपनीने उत्तम फीचर्स असलेला हा 4G फोन लॉन्च केला आहे.

आतापर्यंत Jio Bharat 4G स्मार्टफोन फक्त जिओ रिटेल पार्टनर स्टोअर्स आणि रिलायन्स डिजिटल स्टोअर्सवरच उपलब्ध होता. पण आता आजपासून त्याची विक्री ई-कॉमर्स वेबसाइटवरही सुरू होत आहे. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही Amazon वरून तो खरेदी करू शकता.

जिओने यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. यामध्ये एचडी कॉलिंगसोबत तुम्हाला ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही मिळतो. या फीचर फोनमध्ये तुम्हाला युपीआय पेमेंटचा पर्याय मिळेल. केवळ पेमेंटच नाही तर त्यात तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनही मिळते. यामध्ये तुम्ही जिओ सिनेमाचा आनंदही घेऊ शकता. या फोनमध्ये कंपनीने 23 भारतीय भाषांना सपोर्ट केला आहे.

Jio Bharat 4G फोनच्या मागील बाजूस कार्बन लोगो आढळतो. हा फोन काळ्या आणि लाल रंगात सादर करण्यात आला आहे. या फीचर फोनमध्ये तुम्हाला 1.77 इंच TFT डिस्प्ले मिळणार आहे. फोनच्या मागील बाजूस कॅमेरा आणि टॉर्चची सुविधा आहे. रिलायन्सने फोनमध्ये 128GB पर्यंत बाह्य microSD कार्ड सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 0.3-मेगापिक्सेल (VGA) सेन्सर आहे. तर फोनमध्ये 1,000mAh ची बॅटरी आहे. (हेही वाचा: Legal Notice To Sachin Tendulkar: आमदार Bachchu Kadu पाठवणार सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

दरम्यान, या फोनच्या जिओ ग्राहकांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल 123 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 28 दिवसांची वैधता मिळेल व 14 जीबी डेटाचा समावेश आहे. इतर ऑपरेटरचा व्हॉईस कॉल 2 जीबीचा मासिक प्लॅनसह 179 रुपयांपासून सुरू होतो.