भारतात लाँच होणार iQOO Neo 6 स्मार्टफोन; जाणून घ्या 5G Smartphone चे खास स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
iQOO Neo 6 (PC - Twitter)

स्मार्टफोन ब्रँड iQOO ने अलीकडेच चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 6 लॉन्च केला आहे. तुमच्या iQOO चा हा नवीन स्मार्टफोन आता भारतातही लॉन्च होत आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्च डेटचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. मात्र हा स्मार्टफोन भारतात लाँच होत असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया या फोनचे फीचर्स आणि किंमत.

भारतात नवीन स्मार्टफोन, iQOO Neo 6 लॉन्च होणार आहे. हा फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि आता तो इतर देशांमध्ये लॉन्च केला जात आहे, याची पुष्टी झाली आहे. अशी अपेक्षा आहे की iQOO Neo 6 भारतात मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला सादर केला जाईल. (हेही वाचा - Vivo X80 Series: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात होणार लॉन्‍च विवो 80X सीरीजचे स्‍मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि काय असू शकते किंमत)

iQOO निओ 6 प्रोसेसर -

चीनमध्ये iQOO Neo 6 लाँच झाला तेव्हा तो Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला होता. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 870 SoC प्रोसेसरसह भारतात लॉन्च केला जात आहे. हा स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यामध्ये एक 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येऊ शकतो आणि दुसरा 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह लॉन्च केला जाऊ शकतो.

iQOO Neo 6 ची बॅटरी -

बॅटरीच्या बाबतीत हा स्मार्टफोन खूपच अप्रतिम असणार आहे. तुम्हाला iQOO Neo 6 मध्ये 4,700mAh बॅटरी दिली जाऊ शकते जी कंपनीच्या भारतातील फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 9 Pro मध्ये देखील दिली गेली आहे. इतर iQOO स्मार्टफोन्सप्रमाणे, तुम्हाला iQOO Neo 6 मध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. असे म्हटले जात आहे की, iQOO Neo 6 ला शून्य ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 30 ते 35 मिनिटे लागतील.

iQOO Neo 6 चे इतर स्पेसिफिकेशन्स - 

iQOO Neo 6 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल HD+ रिझोल्यूशनसह येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये 64MP मुख्य सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असू शकतो. सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुम्हाला या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो.

iQOO Neo 6 किंमत -

iQOO Neo 6 च्या किंमतीबद्दल सांगायचे तर, सध्या या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अधिकृतपणे कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे की, iQOO Neo 6 चा 128GB स्टोरेज वेरिएंट 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि 256GB स्टोरेजसह त्याचा टॉप व्हेरिएंट 35 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असू शकतो.