चीनमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर विवो (Vivo) आता भारतात आपल्या 80X सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Vivo X80 Series स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 18 मे रोजी सादर केले जातील. अनेक उत्तम फीचर्सनी सुसज्ज असलेले हे फोन बाजारात येताच धमाल करू शकतात. या मालिकेत Vivo X80 आणि Vivo X80 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील. Vivo X80 सिरीज चीनमध्ये एप्रिलमध्ये लॉन्च करण्यात आली होती. आता ती 18 मे रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केले जातील, त्यानंतर ते भारतीय बाजारपेठेत सादर केले जातील. हे दोन्ही स्मार्टफोन X70 Pro आणि X70 Pro+ चे उत्तराधिकारी असल्याचे मानले जाते.
Vivo X80 Pro हा Snapdragon 8 Gen 1 चिपसेट किंवा MediaTek Dimensity 9000 SoC सह येतो. फोनला 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह कॉन्फिगर केले जाऊ शकते. फोनमध्ये 27-लेयर व्हीसी कूलिंग सिस्टम, एक HiFi ऑडिओ चिप, स्टिरिओ स्पीकर आणि IP68 रेटिंग देखील आहे. हँडसेटमध्ये 80W फास्ट-चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh बॅटरी आहे. Vivo X80 मालिकेतील स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक लार्ज फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
Vivo X80 च्या मागील बाजूस तीन कॅमेरे असतील. यात 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. याशिवाय फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाइड आणि 12MP पोर्ट्रेट सेन्सर दिला जाईल. त्याच वेळी, X80 Pro च्या मागील बाजूस चार कॅमेरे दिले जातील, ज्यात 50MP प्राइमरी, 48MP अल्ट्रा वाइड, 12MP पोर्ट्रेट आणि 8MP पेरिस्कोप लेन्स मिळतील. दोन्ही फोन 32MP सेल्फी कॅमेरा सह येतील. (हेही वाचा: WhatsApp कडून Emoji Reaction चं फीचर आऊट; पहा मेसेज ला प्रतिसाद देताना इमोजी रिकॅक्शन कशा वापराल?)
भारतातील Vivo X80 आणि Vivo X80 Pro च्या किमतीचे तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर केले गेलेले नाहीत, तरीही दोन्ही फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. Vivo X80 चीनमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या प्रारंभिक किंमत CNY 3,699 (अंदाजे रु. 42,600) लाँच करण्यात आला, ज्याची भारतामधील किंमत साधारण 55 हजार असू शकते. तर Vivo X80 Pro CNY 5,499 (अंदाजे रु. 63,300) च्या सुरुवातीच्या किमतीत दाखल झाला, ज्याची भारतामधील किंमत 75 हजार असू शकते. दरम्यान, कंपनीने सांगितले की Vivo X80 सीरीज भारतात 18 मे रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. हे फोन्स फ्लिपकार्टवर देखील लिस्टिंग केले गेले आहेत.