आयफोन (Photo Credit: iMore.com)

आयफोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांसाठी खुशखबर आहे. कारण फ्लिपकार्टवर सर्वास्त स्वस्त किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार iPhone SE (2020) हा अवघ्या 15,200 रुपयांत खरेदी करता येणार आहे. डीलमध्ये आयफोन एसई (2020) फ्लिपकार्टवर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा डिस्काउंट ऑफर 8 मार्चला होणाऱ्या iPhone SE3 5G स्मार्टफोनमुळे दिली जाणार आहे.(Google Map च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या कोणालाही करता येईल ट्रॅक, जाणून घ्या अधिक)

ई-कॉमर्स फ्लिपकार्टवर iPhone SE (2020) स्मार्टफोन 30,298 रुपयांत विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. परंतु त्यावर 14,800 रुपयांची एक्सजेंच ऑफर दिली जाणार आहे. त्यानंतर आयफोन एसई (2020) स्मार्टफोनची किंमत 15,298 रुपये होणार आहे. तसेच फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. अशाप्रकारे तुम्ही आयफोन एसई (2020) हा अगदी कमी किंमतीत खरेदी करु शकता. तसेच Paytm Wallet च्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर 50 रुपयांचा इस्टंट डिस्काउंट ही मिळणार आहे.(नवा Redmi 10 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल अधिक)

आयफोन एसई स्मार्टफोन 4.7 इंचाचा रेटीना HD आयपीएस एलसीडी डिस्प्ले सपोर्ट करणार आहे. याचे रेजॉल्यूशन 750X1334 पिक्सल आहे. फोन Apple च्या A13 Bionic चिपसेट सपोर्टसह येणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) आणि 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या सुविधेसह लैस असणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये एक 7 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला गेला आहे. फोन IP67 डस्ट वॉटर रेजिस्टेंट सपोर्टसह येणार आहे. फोन ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर ऑप्शन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.