iPhone | (Photo Credit: X)

iPhone Durability Test: जागतिक स्तरावर सर्वात टिकाऊ स्मार्टफोनपैकी एक म्हणून iPhones ओळखला जातो. ही ओळख एका आश्चर्यकारक घटनेमध्ये आयफोनने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. दावा केला जात आहे की, एक आयफोन विमानातून 16,000 फूट जमिनीवर पडला. मात्र, इतक्या उंचावरुन पडूनही आयफोन अगदी सुस्थितीत होता. ही घटना पोर्टलँडमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. अलास्का एअरलाइन्स ASA 1282 फ्लाइटची खिडकी तुटल्याने विमानाचे आपत्कालीन लँडींग करावे लागल्याची घटना नुकतीच घडली होती. याच घटनेत फोन आणि इतर लहान वस्तू बाहेर फेकल्या गेल्या. हे विमान पोर्टलँड, ओरेगॉन येथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाला जात, असताना ही घटना घडली.

उंचीवरुन पडूनही iPhone सुस्थितीत

NTSB ने केलेल्या दाव्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, इतक्या उंचीवरुन पडूनही iPhone सुस्थितीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, विमानातून पडूनही सुस्थितीत असलेल्या आयफोनच्या मॉडेलची पुष्टी होऊ शकली नाही. माक्ष, X (पूर्वीचे Twitter) वर शेअर केलेल्या फोटोंनुसार हा Iphone 14 Pro किंवा iPhone 15 Pro चे मॉडेल असू शकते असे बोलले जात आहे. सीनाथन बेट्सने आयफोनचे फोटो X वर शेअर केले आणि लिहिले, “रस्त्याच्या कडेला एक आयफोन सापडला… अजूनही अर्ध्या बॅटरीसह फ्लाईट मोडमध्ये आहे. हा आयफोन अलास्का एअरलाइन्स ASA1282 विमानातून साधारण 16,000 फुटांवरुन पडला आहे. मी या फोनवर संपर्क साधला असता @NTSB वर Zoe ने सांगितले की त्याचा दुसरा आयफोन सापडला आहे. (हेही वाचा, Airplane window blows out Mid-Air: विमानाची खिडकी हवेतच उघडली, काय घडले पुढे? (Watch Video))

अलास्का एअरलाइन्स विमानातून आयफोन पडल्याचा दावा

दुसऱ्या बाजूला, अलास्का एअरलाइन्सने आपल्या 65 बोईंग 737-9 विमानाचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित केले आहे. विमान हवेत असताना अचानक उघडलेल्या खिडकीमुळे विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही घटना टेकऑफच्या काही मिनिटांनंतरच घडली. पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतण्यापूर्वी विमान 16,000 फुटांवर उड्डाण करत होते. अलास्का एअरलाइन्सने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 174 प्रवासी आणि सहा क्रू सदस्यांसह फ्लाइट सुरक्षितपणे उतरले.

एक्स पोस्ट

Apple कपंनी iPhone उत्पादक

आयफोन हा Apple ने बनवलेला एक स्मार्टफोन आहे. जो संगणक, iPod, डिजिटल कॅमेरा आणि सेल्युलर फोन एकाच उपकरणामध्ये उपलब्ध करुन देतो. आयफोन iOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि त्याला टचस्क्रीन इंटरफेस आहे. पहिल्या पिढीतील iPhone ची घोषणा 2007 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून Apple कंपनीने दरवर्षी नवीन iPhone मॉडेल्स आणि iOS अद्यतने जारी केलेली आहेत. आयफोन त्याच्या सुरक्षा आणि गोपनीयता प्रणालींसाठी ओळखला जातो. ज्याची तरुणाई आणि जगभरातील उच्चभ्रू लोकांमध्येही क्रेझ आहे.