iPhone 13 च्या प्री-बुकिंगवर Vodafone Idea देतेय स्पेशल डिल्स आणि कॅशबॅक
iPhone 13 (Photo Credits-Twitter)

जर तुम्ही आयफोन 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आकर्षक डिल्स आणि ऑफर्स मिळणार आहेत. Vodafone Idea ने आयफोन 13 च्या प्री-ऑर्डरसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. जर नागरिकांनी वोडाफोनच्या अधिकृत वेबसाइटवरुन आयफोन 13 खरेदी केल्यास तो तुम्हाला बाजारात उपलब्ध होण्यापूर्वी मिळणार आहे. जर तुम्ही वोडाफोन पोस्टपेड युजर्स असाल तर तुम्हाला बेनिफिट्सचा लाभ घेता येणार आहे. खासकरुन Redx ग्राहकांसाठी कॅशबॅक बेनिफिट्स मिळणार आहेत.

लेटेस्ट iPhone 13 हा 14 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आला होता. आता तो प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त वोडाफोन RedX पोस्टपेड युजर्सल ज्यांनी 1099 प्लॅन, 2299 रुपयांचा फॅमिली प्लनसह RAedX पोस्टपेड प्लॅन्सचे सब्सक्राइब केले आहे त्यांना सुद्धा स्पेशल कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.(Amazon Great Indian Festival Sale ला लवकरच सुरुवात; स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलती)

VI सह iPhone ची प्री- ऑर्डर करणाऱ्या युजर्सला भारतात तो उपलब्धतेपूर्वी खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना अतिरिक्त रुपात REDX वर Netflix, Amazon Prime, Disney + हॉटस्टारवर प्रीमियम एंटरटेन्मेंट, कॉम्प्लिमेंट्री आंतरराष्ट्रीय रोमिंगसह ट्रॅव्हलिंग बेनिफिट्स आणि एअरपोर्ट लाउंज एक्सेस, प्रीमियम कस्टमर सर्विस आणि अन्य काही बेनिफिट्स मिळणार आहेत.

प्रीपेड युजर्ससाठी सुद्धा ऑफर मिळणार आहे. Vodafone Idea युजर्सला iPhone 13 खरेदी करायचा असेल तर त्यांना 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन रिचार्जवर डबल डेटा बेनिफिट्स मिळणार आहेत. युजर्सला विकेंड रोलओवरचा सुद्धा फायदा मिळणार आहेत.

iPhone 13 मॉडेल हे iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro और iPhone 13 Pro Max मध्ये उपलब्ध असून Vodafone Idea च्या सर्व ग्राहकांना तो खरेदी केल्यास कॅशबॅक आणि अन्य डिल्स मिळणार आहेत. डिवाइस movie.com वर प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.