Amazon Great Indian Festival Sale ला लवकरच सुरुवात; स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलती
Amazon Great Indian Festival (Photo Credits-Twitter)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची (Amazon Great Indian Festival Sale) घोषणा करण्यात आली आहे. लवकरच या सेलला सुरुवात होणार असली तरी सेलची तारीख अद्याप समोर आलेली नाही. अधिकृत टीझरनुसार अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन (Smartphone), स्मार्ट टीव्ही (Smart TV), लॅपटॉप (Laptop), स्मार्टवॉच (Smartwatch), वायरलेस इयरबड्स (Wireless Earbuds) आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या सवलतीच्या ऑफर मिळणार आहेत.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलसाठी अॅमेझॉनने एचडीएफसी बँकेसोबत (HDFC Bank) भागीदारी केली आहे जेणेकरून विक्री दरम्यान उपलब्ध असलेल्या सर्व उत्पादनांवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. खरेदीदार एचडीएफसी बँकेच्या डेबिट तसेच क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर त्वरित सूट मिळवू शकतील. याव्यतिरिक्त, ईएमआय व्यवहारांवर त्वरित सूट देखील उपलब्ध असेल.

नेहमीप्रमाणे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान उपलब्ध सूट ऑफर प्राइम मेंबर्ससाठी एक दिवस लवकर उपलब्ध होतील. प्राईम मेंबरशीप मिळण्यासाठी तुम्हाला तीन महिन्यांसाठी 329 रुपये आणि वर्षासाठी 999 रुपये द्यावे लागतील. अमेझॉनच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही मेंबरशीपसाठी अर्ज करू शकता.

अधिकृत टीझरनुसार जुने आणि नवीन दोन्ही आयफोन मॉडेल मोठ्या डिस्काउंट ऑफरसह उपलब्ध असतील. सेल दरम्यान, अॅमेझॉन स्मार्टफोन, स्मार्टटीव्ही, स्मार्टवॉच, टीडब्ल्यूएस इयरबड्स, नेकबँड्स, सिक्युरिटी कॅमेरा यासह विविध इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देईल. ई-कॉमर्स दिग्गज फायर टीव्ही स्टिक, इको डिव्हाइसेस आणि इतरांसह स्वतःच्या उत्पादनांवर मोठी सूट देईल.

गेल्या आठवड्यात फ्लिपकार्टने आगामी सणासुदीसाठी बिग बिलियन डेज सेल आयोजित करण्याची घोषणा केली. बिग बिलियन डेज विक्रीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.  अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोघांनीही येत्या काही दिवसांत विक्रीच्या तारखा जाहीर करणे अपेक्षित आहे.