iPhone 12 mini, iPhone 12 Pro max चा सेल भारतात सुरु, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
iPhone 12 Series (Photo Credits: Apple)

अॅपल (Apple) कंपनीने काही दिवसांपूर्वीच त्यांची बहुप्रतिक्षित iPhone 12 सीरिज लॉन्च केली आहे. या अंतर्गत कंपनीने iPhone 12, iPhone 13 Mini आणि iPhone 12 Pro सह iphone 12 Pro Max लॉन्च केला होता. कंपनीने iPhone 12 Pro आणि iPhone 12 याआधील सेलसाठी उपलब्ध करुन दिला होता. परंतु आता iPhone 12 Mini आणि iPhone 12 Pro Max अधिकृतरित्या युजर्ससाठी सेल करिता उपलब्ध करुन दिला गेला आहे. A14 चिपसेटवर आधारित असलेले हे डिवाइस iOS 14 वर काम करणार आहे.(Apple iPhone: अॅपल आयफोन वापरकर्त्यांना झटका; Apps साठी मोजावे लागणार जास्त पैसे)

भारतीय बाजारात iPhone 12 mini च्या 64GB वेरियंटची किंमत 69,900 रुपये आहे. तर 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 74,900 आणि 256GB मॉडेलची किंमत 84,900 रुपये आहे. तर iPhone 12 Pro Max च्या 128GB मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आणि 256GB मॉडेलची किंमत 1,39,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 512GB स्टोरेज मॉडेलमध्ये सुद्धा उपलब्ध करुन दिला जाणार असून त्याची किंमत 1,59,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

iPhone 12 mini सोबत मिळणाऱ्या ऑफर्स बद्दल बोलायचे झाल्यास HDFC च्या क्रेडिट कार्डवर 6 हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. जो EMI ऑप्शनसह येणार आहे. तर iPhone 12 Pro Max सह युजर्सला 5 हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक सुविधा अॅपल स्टोर आणि डिस्ट्रिब्युटर वर उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एक्सचेंज ऑफरचा सुद्धा लाभ घेऊ शकता.(Digital Key: कार अनलॉकड करण्यासाठी आयफोन, Apple Watch मध्ये 'डिजिटल की' सुविधा लवकरच)

iPhone 12 mini आणि iPhone 12 Pro Max मध्ये ड्युअल सिम सपोर्ट दिला आहे. त्यामध्ये युजर्सला Nano आणि e-SIM चा वापर करता येणार आहे. हे डिवाइस iOS 14 वर आधारित असून त्यामध्ये A14 Bionic chip ही दिली आहे. iPhone 12 Mini मध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. तर iPhone 12 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XdR OLED डिस्प्ले मिळणार आहे.