Apple iPhone: अॅपल आयफोन (Apple iPhone) वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरचं अॅपल आपल्या वापरकर्त्यांना अॅप्स आणि अॅप-मधील सदस्यतेसाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका आणि रशिया या 6 देशांमध्ये Apple App Store आपले शुल्क वाढवणार आहे. अॅपलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, कर वाढल्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागेल आहे. भारतात इंटरनेट कंपन्यांनी 18 टक्के जीएसटी व्यतिरिक्त 2 टक्के कर लादला आहे.
दरम्यान, इक्वीलायझेशन लेवी (Equalisation Levy) हा एक थेट करांचा प्रकार आहे. जो परकीय टेक कंपन्यांकडून डिजिटल व्यवहारातून मिळणाऱ्या कमाईवर वसूल केला जातो. अॅपलने कंपनीने म्हटलं आहे की, 'जेव्हा कर किंवा परकीय चलन दर बदलतात तेव्हा आम्हाला कधीकधी अॅप स्टोअरवरील किंमती अपडेट करण्याची आवश्यकता असते. पुढील काही दिवसांत अॅप स्टोअरवरील अॅप्स आणि अॅप-मधील खरेदी (ऑटो-नूतनीकरण सदस्यता वगळता) च्या किंमती ब्राझील, कोलंबिया, भारत, इंडोनेशिया, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत वाढण्याची शक्यता आहे.' (हेही वाचा - Bolo Indya शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्मने लॉन्च केले Bolo Meets, एकाच वेळी 10 लोकांसोबत करता येणार व्हिडिओ कॉल)
अॅपलने पुढे सांगितलं आहे की, नवीन किंमत जाणून घेण्यासाठी वापरकर्त्यांना Apple डेव्हलपर पोर्टलच्या माय अॅप्स (My Apps) मधील प्राइसिंग (Pricing and Availability) आणि उपलब्धता विभागात जावे लागेल. दरम्यान, भारतात Apple Music, Apple TV+ आणि iCloud सारख्या स्वतःच्या सेवेच्या किंमती देखील बदलतील की, नाही हे अद्याप कंपनीने स्पष्ट केलेलं नाही. (हेही वाचा - रेडमीचा Redmi K30S स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टंट पेमेंटसाठी लोकप्रिय असलेले गुगल पे अॅप अॅपल अॅप स्टोअर वरून काढून टाकण्यात आले होते. आयफोन वापरकर्त्यांना गुगल पेद्वारे व्यवहार करताना पेमेंट एरर आणि इतर अडचणी येत होत्या.