Bolo Indya शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्मने लॉन्च केले Bolo Meets, एकाच वेळी 10 लोकांसोबत करता येणार व्हिडिओ कॉल
Bolo Indya (Photo Credits-Twitter)

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप Bolo Indya ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर Bolo Meets हे फिचर रोलआउट करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच युजर्सला Bolo Indya ने अॅपमध्येच बोलो मिट्सचा सपोर्ट दिला जाणार आहे. यासाठी कोणतेही अन्य अॅप इंन्स्टॉल करण्याची गरज नाही आहे. Bolo Meets खासकरुन Google Meets आणि Zoom अॅप प्रमाणे डिझाइन केले गेले आहे. त्यामुळे युजर्सला आपले फॉलोअर्ससह व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. या Bolo Meets अॅपवर एकाच वेळी अधिकाधिक 10 लोकांसोबत व्हिडिओ कॉलिंगवर बोलता येणार आहे. बोलो मिट्स त्यांच्या या खास सर्विसच्या माध्यमातून मार्च 2021 पर्यंत आपल्या युजर्सची संख्या 300 टक्के अधिक वाढण्याची अपेक्षा करत आहे.(WhatsApp च्या माध्यमातून आता युजर्सला करता येणार शॉपिंग, कंपनी लवकरच घेऊन येणार नवे फिचर)

कंपनीने असा दावा केला आहे की, Bolo Meets च्या माध्यमातून Bolo Indya युजर्स खास कौशल्य असणाऱ्या युजर्सला ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून काही शिकू शकणार आहेत. Bolo Meets अॅपवर सर्वाधिक पसंदी ही ज्योतिष, फिटनेस, म्युझिक, डान्स, इंन्स्ट्रुमेंट, कॉमेडी, पर्सनल फायनान्स, रिलेशनशिप आणि मेंटल वेलनेस यांचा समावेश आहे. पर्सनलाइज्ड अॅस्ट्रॉलॉजीच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी 100 रुपयांचे तिकिट घ्यावे लागते.(Netflix Free Streaming: नेटफ्लिक्सने केली 'फ्री सबस्क्रिप्शन' ऑफरची घोषणा; दोन दिवसांसाठी विनामूल्य पाहू शकाल सिरीज व चित्रपट, 4 डिसेंबरपासून सुरुवात)

Bolo Meets प्लॅटफॉर्मवर क्रिएटर पार्टनर्सना एक एक्सट्रा फिचर मिळणार आहे. त्यामुळे स्पेशल स्किल बेस्ड सर्विसेस क्रिएट करण्यासाठी फॉलोअर्स बेस पर्यंत त्याची मार्केटिंग करु शकतात. खासगी व्हिडिओ चॅट रुमच्या माध्यमातून खास व्यक्तिसोबत बातचीत सुद्धा केली जाऊ शकते. कंपनीने असा दावा केला आहे की, या पद्धतीची सुविधा उपलब्ध करुन देणारे हे पहिलेच अॅप आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर 65 लाखांहून अधिक युजर्स आहेत. त्यामध्ये 28 लाख क्रिएटर्सचा समावेश आहे. हे प्लॅटफॉर्म 14 भाषांमध्ये उपलब्ध आहे.