Netflix Free Streaming: नेटफ्लिक्सने केली 'फ्री सबस्क्रिप्शन' ऑफरची घोषणा; दोन दिवसांसाठी विनामूल्य पाहू शकाल सिरीज व चित्रपट, 4 डिसेंबरपासून सुरुवात 
Netflix (File Image)

सध्या देशात ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये नेटफ्लिक्स (Netflix) आघाडीवर आहे. भारतामधील मेट्रो शहरांमध्ये तर नेटफ्लिक्स ही गरज झाली असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नुकतेच नेटफ्लिक्सने अमेरिकेत विनामूल्य सबस्क्रिप्शनची सुविधा म्हणजेच फ्री ट्रायल सेवा बंद केली आहे. मात्र जर आपल्याकडे नेटफ्लिक्सची सदस्यता नसेल, तर कंपनी विनामूल्य सबस्क्रिप्शनचा एक दुसरा पर्याय आपणास देत आहे. कंपनीची ही विनामूल्य सबस्क्रिप्शन सेवा फक्त दोन दिवस असणार आहे. कंपनी स्ट्रीमफेस्ट अंतर्गत 48 तासांची ही फ्री ट्रायल ऑफर करत आहे.

म्हणजेच विकेंडला दोन दिवस तुम्ही विनामूल्य नेटफ्लिक्सचा अनाद घेऊ शकणार आहात. अधिकाधिक लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. आता आपल्याकडे नेटफ्लिक्स नसल्यास, आपण नेटफ्लिक्सवर दोन दिवस विनामूल्य सिरीज किंवा चित्रपट पाहू शकता. ही ऑफर सध्या भारतीय ग्राहकांसाठी असून ती 4 डिसेंबरपासून सुरू होईल. या ऑफरला स्ट्रीमफेस्ट म्हटले जाईल व सध्या त्याची चाचणी केली जात आहे.

स्ट्रीमफेस्टच्या प्रमोशनल ऑफरची चांगली गोष्ट ही आहे की, यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा इतर तपशील देण्याची गरज नाही, पूर्वी 1 महिन्याची विनामूल्य चाचणी दिली जात होती तेव्हा वापरकर्त्यांना आपल्या कार्ड्सचा तपशील देणे अनिवार्य होते. ट्रायल संपल्यानंतर आपल्या खात्यातून पैसे कट होत असत. यामध्ये आपल्याला सदस्यता रद्द करण्याचा पर्यायही उपलब्ध होता. (हेही वाचा: एलजी कंपनीने सादर केला जगातील पहिला Rollable Smart TV; किंमत फक्त 64 लाख, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)

दरम्यान, नेटफ्लिक्सने यापूर्वी भारतात विविध प्रकारचे जाहिराती केल्या आहेत आणि प्रथम भारतात आणि नंतर जागतिक स्तरावर या नवीन योजना सादर केल्या आहेत. नेटफ्लिक्सने त्याच्या यूआयमध्ये बदल केले आहेत आणि आता ते हिंदीमध्ये उपलब्ध आहे. वापरकर्ते हिंदीमध्ये चित्रपट किंवा टीव्ही शीर्षके आणि डिसक्रिप्शन वाचू शकतात.