इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp लवकरच त्यांचे एक नवे फिचर घेऊन येणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप बिझनेसच्या नावाने ओळखले जाणार आहे. याच्या मदतीने युजर्सला गुड्स अॅन्ड सर्विसेसची खरेदी चॅटिंगच्या माध्यमातून करता येणार आहे. यासाठी युजर्सला सिंपल चॅटिंगची मदत घ्यावी लागणार आहे. त्याचसोबत व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सुद्धा प्रोडक्ट्सची संपूर्ण माहिती मिळणार आहे. सध्याच्या काळात हे फिचर Under Development असून ते लवकरच टेस्टिंग नंतर रोलआउट केले जाणार आहे.
रिपोर्टनुसार, WhatsApp फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप बिझसेन रिपोर्ट अकाउंट युजर्स थेट आपल्या कस्टमरला प्रोडक्टसचे कॅटलॉग दाखवू शकणार आहे. यासाठी WhatsApp वर एक शॉपिंग बटण जोडले जाणार आहे. हे शॉपिंग बटण लवकरच भारतात रोलआउट केले जाणार आहे. WhatsApp च्या या शॉपिंग बटणमध्ये युजर्सला आपले प्रोडक्ट्स अॅड करता येणार आहेत. जे थेट कस्टमरला दिसणार आहेत. WhatsApp चॅटच्या माध्यमातून ते तपासून ही पाहता येणार आहेत. तर व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर लहान उद्योजगांच्या फायद्यासाठी ठरणार आहे.(WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप वर अनावश्यक चॅट टाळण्यासाठी त्याचा आवाज करा 'कायमचा Mute', फॉलो करा या सोप्या स्टेप्स)
फेसबुकच्या रिपोर्टनुसार, WhatsApp कडून नुकतीच अशी घोषणा करण्यात आली आहे की, WhatsApp Business App साठी काही शुल्क उद्योजकांकडून घेऊ शकतात. तर हे शुल्क किती असणार याबद्दल फेसबुक कडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. म्हणजेच उद्योजकांना काही सर्विस मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पंरतु कस्टमरसाठी व्हॉट्सअॅप बिझनेस फ्री असणार आहे.