रेडमीचा Redmi K30S स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Redmi K30S (Photo Credit - Twitter)

रेडमीने K30S सीरिजचा नवीन स्मार्टफोन Redmi K30S लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,299 युआन म्हणजेच 28,609 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. Redmi K30S स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले असून 144 हर्ट्जचा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 5000 mAh असून तो 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या जबरदस्त 5 जी फोनचा मागील आणि पुढच्या बाजूला गोरिल्ला ग्लास बसविण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित आहे. Redmi K30S 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्येदेखील बाजारात उपलब्ध आहे. त्याची किंमत 2,799 युआन म्हणजेच 30,850 रुपये आहे. (हेही वाचा - Redmi Smartphones Sales: जबरदस्त ऑफर! रेडमी नोट प्रो, रेडमी नोट 9 प्रो मॅक्स, रेडमी नोट 9 या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 4 हजारांपर्यंत सूट)

दरम्यान, Redmi K30S मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे आणि त्यानंतर 13 मेगापिक्सलचा अल्ट्राव्हायोलेट लेन्स तसेच 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. रेडमीच्या या फोनवरून तुम्ही 8K व्हिडिओ शूट देखील करू शकता. तसेच आपण 1080p मध्ये स्लो मोशन व्हिडिओ शूट करू शकता. रेडमीच्या 30 एस स्मार्टफोनमध्ये बर्‍याचे आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत. (हेही वाचा - Flipkart Big Diwali Sale 2020 ला 29 ऑक्टोबर पासून सुरुवात; स्मार्टफोन्स, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सवर बंपर ऑफर)

विशेष म्हणजे Redmi K30S हा स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह सर्वात स्वस्त फोन आहे. या स्मार्टफोनच्या खास फिचर्समुळे याची मागणी जास्त आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच झाला असून हा Redmi K30S सीरिजमधील शेवटचा फोन मानला जात आहे. सध्या बाजारात Redmi K30 5G, Redmi K30 Pro 5G, Redmi K30 4G, Redmi K30 Pro 5G झूम एडिशन, Redmi K30 5G रेसिंग एडिशन, Redmi K30i 5G आणि Redmi K30 Ultra सारख्या स्मार्टफोनचे वर्चस्व आहे. लवकरच भारतातदेखील हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.