Flipkart Big Diwali Sale 2020 ला 29 ऑक्टोबर पासून सुरुवात; स्मार्टफोन्स, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सवर बंपर ऑफर
Flipkart Big Diwali Sale 2020 (Photo Credits: Flipkart)

फ्लिपकार्ट (Flipkart) या लोकप्रिय ई-कॉमर्स साईटने आपल्या दिवाळी सेलची घोषणा केली आहे. 29 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल 2020 (Flipkart Big Diwali Sale 2020) ला प्रारंभ होत आहे. नुकताच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज (Big Billion Days Sale) संपला. त्यानंतर आता दिवाळी सेलमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. परंतु, फ्लिपकार्टचा दसरा स्पेशल सेल अजूनही सुरु असून 28 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. यात ग्राहकांना बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) आणि विविध प्रॉडक्ट्सवर जबसदस्त डिस्काऊंट मिळत आहे. (Flipkart Dussehra Specials Sale: फ्लिपकार्ट वर दसर्‍याच्या निमित्ताने iPhone 11 Pro, Realme C3, Poco M2 सह स्मार्ट्फोन्सवर धमाकेदार ऑफर्स)

Flipkart Big Diwali Sale 2020 ला 29 ऑक्टोबर पासून सुरुवात होत असली तरी फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी या सेल 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून खुला होणार आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे. Bajaj Finserve, HDFC, ICICI, SBI आणि इतर बँकांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जात आहे.

या सेल अंतर्गत सॅमसंगच्या Galaxy F41, Galaxy S20+, Galaxy A50s आणि इतर स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळत आहे. ऑपोच्या Reno 2F, A52, आणि F15 वर देखील डिस्काऊंट दिले जात आहे. पोकोच्या M2, M2 Pro, आणि C3 वरही आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे Realme Narzo 20 सिरीजवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहेत.

त्याचप्रमाणे विविध मोबाईल्स, टीव्ही आणि इतर प्रॉडक्सवर दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि सकाळी 8 वाजता वेगवेगळ्या डिल्स सुरु होतील. या डिल्समध्ये तुम्ही प्रॉडक्टस सर्वात कमी किंमतीत विकत घेऊ शकाल. या व्यतिरिक्त कॅमेरा, लॅपटॉप्स, स्मार्ट वॉचेस, हेडफोन्स या इलेक्ट्रॉनिक्सवर 80% पर्यंत डिस्काऊंट मिळू शकेल. तसंच वॉशिंग मशिन, मायक्रोव्हेव, फ्रिज यांसारख्या विविध किचन अप्लायन्सेस वर देखील डिस्काऊंट पाहायला मिळेल.