इनफिनिक्स कंपनी उद्या म्हणजेच 21 जुलै आपला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि लोकांना उत्सुकता लागून राहिलेला Infinix Smart 4 Plus हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. या संदर्भात ऑनलाईन शॉपिंग फ्लिपकार्टवर (Flipkart) टीजर जारी करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे जबरदस्त फिचर्स या साइटवर सांगण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात 6.82 इंचाची ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आली आहे. ज्यात सिनेमॅटिक अनुभव मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp Chats जुन्या मोबाईलमधून नवीन फोनमध्ये आणण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्प्या स्टेप्स
या स्मार्टफोनच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 23 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक आणि 44 तासांचा प्लेबॅक म्यूजिक, 15 तासांचा गेमिंग टाईम, 23 तासांचा सर्फिंग आणि 38 तासांचा 4G टॉकटाईम आणि 31 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळेल.
या स्मार्टफोनच्या स्टोरेजविषयी आणि कॅमे-याविषयी अन्य कोणतीही माहिती दिलेली नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर या विषयी गुप्तता ठेवण्यात आली आहे. ज्याबद्दल आपल्याला उद्याच हा स्मार्टफोन लाँच झाल्यावर माहिती मिळेल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे याचे टीजर देखील फ्लिपकार्ट होम पेजवर ठेवण्यात आले आहे. उद्या (21 जुलै) दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन भारतात लाँच होईल.