Infinix कंपनीने भारतात नवी सीरिज लाँच केली आहे. Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro भारतात लाँच केले आहेत. किंमत आणि वैशिष्ट्यांबाबतीत ही सीरिज अव्वल आहे. भारतीय बाजारात येताच हे Realme, Xiaomi स्मार्टफोन्सला तगडी टक्कर देतील. Infinix Note 10 मध्ये 48MP चा ट्रिपल रियर देण्यात आला आहे. तर Note 10 Pro मध्ये 64MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा, बॅटरी लाईफ आणि स्टोरेज फिचर्स देण्यात आले आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टोरेजचे पर्याय देखील मिळत आहे.
Infinix Note 10 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज ची किंमत 10,999 रुपये आहे. तर 6GB RAM+ 128GB स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे. Infinix Note Pro मध्ये 8GB RAM + 256GB वेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 13 जूनला ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर होईल.हेदेखील वाचा- Reliance Jio चा नवा प्लॅन: 1999 रुपयांत मिळणार कॉलिंग, डेटा आणि फोन अगदी मोफत
Accelerate and #OutplayTheRest
The Infinix #NOTE10 starting at just ₹10,999, goes on sale 13th June https://t.co/laHhEbDtqP
The Infinix #NOTE10Pro is the ultimate gaming weapon, pre-booking starts on 13th June only on @Flipkart
https://t.co/1Xxj32ss6C pic.twitter.com/zUwYUZgMSG
— InfinixIndia (@InfinixIndia) June 7, 2021
Infinix Note 10 ची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनची किंमत 6.95 इंचाची FHD+LCD IPS डिस्प्ले पंच होलसह दिली आहे. हा 180Hz टच सॅपलिंग रेट, 2460x1080 रिजोल्युशन सह येते. यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP चा मॅक्रो लेन्स दिला आहे. तसेच या 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 देण्यात आले आहे. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. तसेच यात टाइप-सी पोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 11 वर आधारित XOS 7.6 वर काम करतो. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.
Infinix Note 10 Pro वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनची किंमत 6.95 इंचाची FHD+LCD IPS डिस्प्ले पंच होलसह दिली आहे. हा 90Hz टच सॅपलिंग रेट, 2460x1080 रिजोल्युशन सह येते. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP डेप्थ सेंसर आणि 2MP ब्लॅक अँड व्हाईट लेन्ससह येतो. या हँडसेटमध्ये 16MP चा AI फ्रंट कॅमेरा आहे, जो ड्युल LED फ्लॅशसह येतो. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. तसेच यात टाइप-सी पोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 11 वर आधारित XOS 7.6 वर काम करतो. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.