Infinix Smart 4 Plus Launched In India: इनफिनिक्स कंपनीने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Infinix Smart 4 Plus (Photo Credit: Twitter)

इनफिनिक्स कंपनीचा स्मार्टफोन इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस (Infinix Smart 4 Plus) भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन इनफिनिक्स 3 प्लसचा अपग्रेड मॉडेल आहे, जो भारतात एप्रिल 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस केवळ एकाच वेरिएंट आणि तीन रंगामध्ये बाजारात आणला गेला आहे. या स्मार्टफोन खासियत म्हणजे, यात 6 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ड्युअल कॅमेरा, मीडियाटेक हीलियो ए25 चिपसेट आणि 6. 82 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एकदा चार्ज केल्यानंतर 23 घंटेचा व्हिडिओ प्लेबॅक मिळणार आहे. इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस बाजारात दाखल झाल्यानंतर संमसंग कंपनीला टक्कर देऊ शकतो.

भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या शाओमी, ओप्पो आणि सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनला अधिक मागणी आहे. परंतु, इनफिनिक्स स्मार्टफोन 4 प्लस बाजारात दाखल झाल्यानंतर अधिक पसंती मिळवेल असा विश्वास, इनफिनिक्स इंडियाचे सीईओ अनीश कपूर यांनी व्यक्त केला आहे. कंपनीने इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लसची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवली आहे. तसेच 28 जुलै रोजी फ्लिपकार्टवर या फोनच्या विक्रीसाठी पहिल्या सेलचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजेपासून Infinix Smart 4 Plus हा फोन फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असेल. हे देखील वाचा- Realme Narzo 10 स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर होणार विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या याची किंमत आणि खास वैशिष्ट्ये

इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लसची वैशिष्ट-

अँड्रॉइड 10 आधारित XOS 6.2 वर कार्यरत असलेल्या इन्फिनिक्सच्या नवीन फोनमध्ये 6.82 इंच एचडी+ स्क्रीन असून ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए-25 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम 3 जीबी व इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय DTS-HD सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे. फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याती 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

इनफिनिक्स स्मार्ट 4 प्लस खरेदीवर एक्सिस बॅंकच्या खातेदारांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. एक्सिस बॅंकच्या क्रेडीट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर, डेबिड कार्ड वापरकर्त्यांना 7 हजार 500 रुपयांच्यापेक्षा अधिक खरेदी करणाऱ्यांना 75 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.