Infinix Hot 10 Play भारतात उद्या होणार लॉन्च; काय आहेत वैशिष्ट्यं आणि किंमत? जाणून घ्या
Infinix Hot 10 Play Smartphone (Photo Credits: Infinix)

हॉंगकॉंग मधील स्मार्टफोन कंपनी इंफिनिक्स (Infinix) आपला नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. इंफिनिक्स हॉट 10 प्ले (Infinix Hot 10 Play) हा स्मार्टफोन उद्या भारतात लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) वर या मोबाईलच्या सर्व डिटेल्स पाहायला मिळत आहेत. भारतापूर्वी हा स्मार्टफोन फिलिपिन्समध्ये लॉन्च झाला आहे. उद्या (19 एप्रिल) फ्लिपकार्टद्वारे हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. (भारतात लाँच झाला Infinix Smart 5 स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत ऐकून तुम्हाला बसेल सुखद धक्का)

इंफिनिक्स हॉट 10 प्ले ची भारतामधील किंमत 10,000 रुपयांपर्यंत असू शकते. फिलिपिन्स मार्केटमध्ये त्यांची किंमत 4290 पीएचपी इतकी होती. या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा एचडी+आपीएस डिस्प्ले दिला असून 1640 x 720 पिक्सल इतके स्क्रिन रिज्योल्यूशन दिले आहे. या मोबाईलमध्ये मीडिया टेकचा हेलिओ जी 35 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. हा मोबाईल अॅनरॉईड 10 व्हर्जनवर काम करतो.

Infinix India Tweet:

या मोबाईलमध्ये ड्युअल रियल कॅमेरा देण्यात आला आहे.यात 13 MP चा प्रायमरी सेन्सर दिला असून त्याला एआय लेन्सचा सपोर्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोबाईलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 10W च्या चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आला आहे.