पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) हा मासिक रेडिओ कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमानंतर याबाबतच्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर 'Dislikes' मिळाल्याचे दिसून आले होते. मात्र, पंतप्रधानांनी या कार्यक्रमात ज्या अॅप्सचा उल्लेख केला त्यापैकी बऱ्याच अॅप्सला लोकांची पसंती मिळाली आहे. असे अॅप्स प्ले स्टोअरच्या 'पहिल्या 10' (Top 10) मध्ये सामील झाले आहेत. प्ले स्टोअरवरील सोशल' श्रेण्यांमधील टॉप ट्रेंडिंगमध्ये स्नॅपचॅट, शेअरचॅट, मोज (Moj), रोपोसो आणि चिंगारी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर Ap Sarkar Seva, Drishti, Saradata, VootKids, PunjabEducare, Doubtnut, Kutuki Kids ही शिक्षण श्रेणीतील लोकांची नवीन पसंती बनली आहे.
या व्यतिरिक्त आरोग्य आणि फिटनेस प्रकारात आरोग्य्य सेतूने अव्वल क्रमांक पटकाविला आहे, त्यानंतर Stepsetgo, Home Workout, Loss Weight app for men, Increase Height Workout, Six Packs in 30 days यांचा समावेश आहे. रविवारी ‘मन की बात’ दरम्यान पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला आणि त्यामध्ये तरुणांनी योगदान देण्याचे आवाहन केले. दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, ‘ऑगस्टच्या सुरूवातीस देशातील तरुणांसमोर अॅप इनोव्हेशन चॅलेंज ठेवले गेले व आमच्या युवकांनी या आत्मनिर्भर इंडिया अॅप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये उत्साहाने भाग घेतला.’ (हेही वाचा: विमान कंपनी स्पाइसजेट उतरली वैद्यकीय उपकरण व्यवसायात, लॉन्च केला व्हेंटीलेटर)
पीएम मोदी यांनी या कार्यक्रमात 4 आश्चर्यकारक देशी अॅप्स, तसेच ती कशी कार्य करतात याचा उल्लेख केला. यामध्ये kids Learning अॅप Kutuki आहे, ज्याबाबत सांगितले गेले की, लहान मुलांसाठी हे असे Interactive App आहे ज्यामध्ये मुले गाणी आणि कथांद्वारे गणित व विज्ञान विषयात खूप काही शिकू शकतात. तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला हे अॅप्स माहित असलेच पाहिजे आणि त्यात आपणही सामील व्हायला हवे. कदाचित आपणही असे काहीतरी तयार करण्यासाठी प्रेरित होऊ शकता.